छत उखडल्यानंतरही भरधाव धावत होती एसटी, झी 24 तासच्या बातमीनंतर मोठी कारवाई

Gadchiroli ST Bus Viral Video: गडचिरोलीत एसटी बसची (Gadchiroli St Bus) दुरावस्था दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला होता. एसटीचे छप्पर अर्धवटस्थितीत तुटलेल्या अवस्थेत असतानाही भरधाव वेगात ती धावत होती. धोकादायक स्थितीत धावणाऱ्या बसमुळं प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता श्री. शी. रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे. (Msrtc Bus Video)

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची बस क्र. एमएच ४०वाय ५४९४ ही गडचिरोली मुलचीरा मार्गे अहेरी या मार्गावर धावत होती. यावेळी वाहकाच्या बाजूकडील बसचे छत पुर्णपणे उखडून हवेत उडत असल्याचा व्हिडीओ विविध समाज माध्यमे व वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आला होता. 
यासंदर्भात सदर बसचे दुरुस्तीचे काम विभागीय कार्यशाळेमध्ये विहित वेळेत न केल्याने संबंधीत विभागाचे यंत्र अभियंता श्री. शी. रा. बिराजदार (विभागीय यंत्र अभियंता, गडचिरोली) यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रवासी वाहनाचे काम विहित वेळेत पूर्ण न करणे तसेच सदर वाहन त्रुटीसह प्रवासी वाहतूकीसाठी रस्त्यावर उपलब्ध करून देणे, त्यामुळे जनमानसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन होणे या कारणास्तव श्री. बिराजदार यांना जबाबदार धरून पुढील चौकशी पुर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे, असं आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :  article about wildlife researcher dharmaraj patil zws 70 | ‘मेरी आवाज़ सुन रहे हो ना धर्मराज..?’

तसंच, वाहनाची दुरूस्ती अथवा वाहन बांधणीतील त्रुटी न काढता कोणतेही वाहन प्रवासी वाहतूकीसाठी न वापरण्याच्या सुचना राज्यातील सर्व स्थानिक एसटी प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देऊन बसेस मार्गस्थ कराव्यात असे निर्देश सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत.

व्हायरल व्हिडिओत काय?

एसटी बसचा व्हायरल व्हिडिओ गडचिरोलीतील आहे. बसचे छत तुटलेले आहे तरीही न थांबवता बसचा चालक ती दमटवत पुढे नेत आहे. लाल परीचे छत पूर्णपणे तुटलेले आहे. मात्र असे असतानाही भरधाव वेगात ही बस पुढे धावत आहे. या एसटीच्या पुढे असलेल्या वाहनातील इसमाने हा व्हिडिओ काढला आहे. 

एसटीची दुरावस्था

एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. गाव खेड्यात अजूनही एसटीनेच प्रवास केला जातो. अनेक आगारातील एसटी बसेसच्या फुटलेल्या काचा, फाटलेल्या सीट आणि पत्रा गंजलेला अशा अवस्थेत दिसत आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. एसटीच्या ताफ्यातील अनेक बसेसची दुरावस्था झाली आहे. काही बस या मोडकळीस आलेल्या आहेत. तरीही ग्रामीण भागात सर्रास या बस सोडल्या जातात. 

हेही वाचा :  हूश्श! येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार, वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्ती

Sangali News : कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार …

OTP कशासाठी वापरला? रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट होता का? निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

Ravindra Waikar :  मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली निवडणूक वादाच्या भोव-यात सापडली आहे. शिवसेनेचे विजयी …