रक्त होईल स्वच्छ आणि चेहरा चमकू लागेल,डॉक्टरांनी सांगितला चमकदार त्वचा मिळविण्याचा सोपा मार्ग

चमकदार, तेजस्वी त्वचा प्रत्येकाला हवी असते. यासाठी अनेक जण मेकअप किंवा सीसी क्रीम लावतात. परंतु नितळ त्वचा मिळवणे ही सोपी गोष्टी नाही. विशेषत: त्वचेवरील मुरुम घालवणे सर्वात कठीण काम असते. पण जर तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल तर
या सोप्या ४ टिप्स फॉलो करुन तुम्ही अशी सुंदर त्वचा मिळवू शकता. आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी दिलेल्या काही टिप्स तुम्ही फॉलो करु शकता. (फोटो क्रेडिट्स: istock, Instagram @anjalimukerjee)

हे आहे पुरळ येण्याचे मुख्य कारण ?

हे आहे पुरळ येण्याचे मुख्य कारण ?

अंजली मुखर्जी यांनी तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील पुरळ येण्याचे मुख्य कारण सांगितले आहे. त्याचप्रमाणे या समस्येचा आपण मुळापासून सुटका मिळवू शकतो. यामध्ये हार्मोन्स खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, परंतु काहीवेळा कारण काहीतरी वेगळे असू शकते. काहींच्या शरीरात विषारी पदार्थाचे सेवन जास्त झाल्याने ही समस्य उद्भवू शकते. स्टिरॉइडवर आधारित औषधे घेतल्याने किंवा खराब दर्जाची सौंदर्यप्रसाधने वापरल्यामुळे असे होऊ शकते.

हेही वाचा :  पुण्यात चाललंय काय? हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणीकडून लग्नासाठी तरुणाचं अपहरण

तुम्ही काय खाताय या गोष्टीचा विचार करा

तुम्ही काय खाताय या गोष्टीचा विचार करा

जर तुम्हाला चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर तुम्ही काय खात आहात या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. समस्येचे मुळ कळाल्याशिवाय तुम्ही या समस्येवर तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे समस्येचे मुळ शोधणे गरजेचे असते असे डॉक्टर सांगतात. एकदा तुम्हाला कारण कळाले की तुम्हाला हेल्थकेअर प्रोव्हायडरची मदत घेता येईल.

अशी मिळवा सुटका…

हा आयुर्वेदिक काढा ट्राय करा

हा आयुर्वेदिक काढा ट्राय करा

डॉक्टर महामंजिष्ठादी काढा सारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेले काढ्याचा घेण्याचा सल्ला दिला. या अशा गोष्टी शरीरातील रक्त स्वच्छ करतात. यामुळे वारंवार मुरुमांची समस्या बर्‍याच प्रमाणात नियंत्रित मिळवण्यास मदत होते.

(वाचा :- Chocolate Day 2023: ला चॉकलेट गिफ्ट देण्यापेक्षा चेहऱ्यावर लावून मिळावा नितळ कांती, चॉकलेट फेस पॅकचे 5 फायदे )

काय खाऊ नये

काय खाऊ नये

अंजली मुखर्जीच्या म्हणण्यानुसार, रक्त स्वच्छ करण्यासाठी आणि मुरुमांच्या समस्येला बाय-बाय म्हणायचे असेल तर त्यासाठी काही गोष्टी थांबवाव्या लागतील.

  • जंक फूड, चॉकलेट आणि कोल्ड्रिंक्स घेणे टाळा.या गोष्टींचे सेवन केल्याने पुरळ निर्माण होऊ शकते.
  • टाटे, चिप्स, पिझ्झा, तळलेले स्नॅक्स, फरसाण खाणे टाळा. या गोष्टींमध्ये भरपूर ट्रान्सफॅट असते, ज्यामुळे मुरुमे होतात.
हेही वाचा :  भिडेंसह काँग्रेसच्या ‘शिदोरी’ वर सुद्धा कारवाई होणार! फडणवीसांची विधानसभेत स्पष्टोक्ती

​(वाचा :- कोरफडचा वापर करून केस होतील घनदाट, फक्त वापरण्याची योग्य पद्धत माहीत हवी) ​

मग काय खावे?

मग काय खावे?

वर नमूद केलेल्या गोष्टी जर हानी करत असतील तर त्वचेसाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर पोषणतज्ञांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्याचं उत्तरही दिलं आहे. त्यांनी सांगितले की, जेवणात कोणत्या गोष्टींचे प्रमाण वाढवावे.
अन्नामध्ये फायबर, ताजी फळे, ताज्या भाज्या आणि चांगल्या फॅट्सचे प्रमाण वाढवा. याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून येईल

टिप: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. तो कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषध किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. )Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : तीन तिघाडा, काम बिघाडा..! अजितदादांमुळे महायुतीला फटका? पाहा स्पेशल रिपोर्ट

Special Report On Mahayuti Politics : लोकसभेच्या निकालात महायुतीचा राज्यात धुव्वा उडाला. आता महायुतीत यावरुन …

पुण्याच्या रस्त्यावर बाईकस्वाराला चिरडणारी मर्सिडीज बेंज कोणाच्या मालकीची? माहिती आली समोर

Pune Accident: पुण्याच्या रस्त्यांवर धावणाऱ्या महागड्या गाड्यांखाली चिरडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. त्यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर …