देशभरातल्या करदात्यांसाठी गुड न्यूज! फोनपे इन्कम टॅक्स पेमेंट फीचर सुरु, तुम्हाला ‘असा’ मिळेल फायदा

Phonepay Income Tax Payment: देशभरातील करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नागरिकांना आपला इनकम टॅक्स भरण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे दिलेली मुदतदेखील निघून जाते. पण आता टॅक्स पेयर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म फोनपे ने आयकर भरणे सोपे करण्यासाठी एक नवीन फीचर लाँच केले आहे. 

फोनपेच्य या फिचरमुळे यूजर्स त्यांचे सेल्फ असेसमेंट आणि अॅडव्हान्स टॅक्सचे पेमेंट अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहेत. तुम्हाला आता यासाठी आयकर पोर्टलवर जाण्याची गरज नाही.आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. लोकांना आयकर रिटर्न भरण्यात अडचणी येत असताना ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे देशभरातील सर्व करदात्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. 

PhonePe ने डिजिटल B2B पेमेंट सेवा PayMate शी करार केला आहे. याद्वारे ग्राहकांना आयकराशी संबंधित ही सुविधा दिली जाणार आहे. यूजर्स क्रेडिट कार्ड तसेच यूपीआयद्वारे त्यांचा कर भरू शकतात. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना याचा मोठा फायदा होईल. त्यांना पेमेंट करण्यासाठी रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत. तसेच 45 दिवसांपर्यंतचा व्याजमुक्त कालावधी देखील मिळेल. हे निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड्सना लागू असेल याची नोंद घ्या.

हेही वाचा :  School Holidays: नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला 'इतक्या' सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स आयडी कसा तयार करणार?

पेमेंट केल्यानंतर, करदात्यांना एक युनिक ट्रान्झॅक्शन रेफरन्स (UTR) आयडी मिळेल. जो तुम्ही केलेल्या पेमेंटचा पुरावा असेल.  ग्राहकांना त्यांचा यूटीआर आयडी एका दिवसात मिळेल. त्याच वेळी, त्याचे चलन तयार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी लागेल.

PhonePe हे भारतातील सर्वात मोठे यूपीआय अॅप आहे.  त्यांनी अनेक नवी फिचर्स आणले आहे. त्यातील इन्कम टॅक्स पेमेंट हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे स्टार्टअप आपल्या 40 कोटींहून अधिक ग्राहकांना त्यांचे आर्थिक व्यवहार सुलभ करण्याच्या दिशेने दररोज नवीन पाऊल टाकत असते.

फोनपेद्वारे कर कसा भरावा?

फोनपेद्वारे कर भरणे खूप सोपे आहे. यूजर्सनी प्रथम अॅपच्या होम पेजवर इन्कम टॅक्स आयकॉन निवडावा. त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचा कर भरत आहात हे निवडा. तुमचे मूल्यांकन वर्ष आणि पॅन कार्डची माहिती द्या. त्यानंतर कराची रक्कम टाइप करा आणि पेमेंटची पद्धत निवडून पुढे जा. त्यानंतर भरलेल्या कराची रक्कम दोन व्यावसायिक दिवसांत कर पोर्टलवर जमा केली जाईल.

व्यापारी कर्ज देण्याची सेवा महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आली होती. फोनपेने साधारण एक महिन्यापूर्वी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्यापारी कर्ज सेवा सुरू केली होती. या अंतर्गत, कंपनी आपल्या व्यापाऱ्यांना आपल्या तंत्रज्ञानाद्वारे आणि त्याच्या मोठ्या वितरण नेटवर्कद्वारे बँका आणि एनबीएफसी भागीदारांद्वारे कर्ज देईल.

हेही वाचा :  होळी खेळताना रंग जावून खराब होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन, ‘या’ टिप्सने मिनिटात करा साफ

कर्ज देणे आणि नंतर ते वसूल करणे ही बँका आणि एनबीएफसी यांची जबाबदारी असेल. या पायलट प्रोजेक्ट दरम्यान, मे 2023 पासून ही सेवा सुरू होईपर्यंत, फोनपेने सुमारे 20 हजार कर्ज देखील दिले होते, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Appleच्या वॉरंटी पॉलिसीमध्ये मोठा बदल; ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री?

Apple Warranty Check: Apple कंपनीने त्यांच्या रिपेअर आणि वॉरंटी पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या …

14 लाखांमध्ये 8 सीटर कार मिळत असताना का खरेदी करायची 5 किंवा 7 सीटर कार?

Best MPV 8 Seater Cars in India : भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खासगी वाहनांना मिळणारी …