प्रत्यक्षात कसा दिसतो शनी ग्रह? चंद्र आणि शनीचा फोटो पाहून व्हाल आश्चर्यचकित

Trending photo : नासा (National Aeronautics and Space Administration) अनेकदा अंतराळातील आश्चर्यकारक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. इस्त्रोने चांद्रयान 3 चं यशस्वी (Chandrayaan 3) प्रक्षेपण केलं आहे. अवकाशातील ग्रह प्रत्यक्षात कसे दिसतात हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते. शनी आणि चंद्र प्रत्यक्षात कसा दिसतो हे दाखविणारे फोटो नासाने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (trending photo nasa captures saturn and moon shani viral on Internet)

अंतराळातील चंद्र आण शनि हे सुंदर फोटो पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होणार यात शंका नाही. NASA त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी हे फोटो शेअर केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत. 

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता शनी ग्रहाचा एक भाग, त्याचं वलय दिसतंय. सोबतच काही अंतरावर चंद्रही दिसतोय. कॅसिनी अंतराळयाने हे फोटो घेतले आहेत. सुमारे 576,000 मैल (927,000 किमी.) वरून हे फोटो घेण्यात आले आहेत. वायमंडल, चुंबकीय क्षेत्र, चंद्र आणि वलयांचा अभ्यास करताना हा फोटो काढण्यात आला आहे. 

हा फोटो शेअर करताना NASA ने लिहिलं आहे की, ‘शनीच्या रिंग एका कोनात दिसतात, तर ग्रहाच्या पिवळ्या पृष्ठभागावर एक पातळ रेषा तयार झाली आहे, आणि वरच्या उजवीकडे अंतराळाच्या काळेपणाकडे पसरतात. रिंगच्या खाली, चंद्र मिमास ग्रहाच्या जवळ एक लहान बिंदूसारखा दिसतोय.’

हेही वाचा :  IRCTC ला एका दुकानदाराने काढले मूर्खात; साइट हॅक करून विकली लाखोंची तिकिटे

हा फोटो शेअर केल्यापासून तो सोशल मीडियावर व्हायरल तर झालाच आहे. सध्या तो इंटरनेटवर आज ट्रेंडिंगदेखील झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 8.21 लाखांहून अधिक लाइक मिळाले आहेत. तर 2 हजारापेक्षात जास्त लोकांनी त्यावर कंमेट्स केले आहेत. 

शनी ग्रह म्हणजे ज्योतिषशास्त्रातील शनिदेव चंद्रासमोर किती मोठा दिसतोय हे दाखविणारा हा अतिशय सुंदर असं चित्र पाहून नेटकरी भारावले आहेत. 

 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …