Breaking News

SGB: भारतीयांकडून जूनमध्ये 4604 कोटींची सोने खरेदी, ‘या’ सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या

Sovereign Gold Bonds Scheme: गेल्या महिन्यात शेअर बाजारातील तेजीच्या दरम्यान, भारतीयांनी या आर्थिक वर्षातील पहिल्या सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मालिकेत मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले. 19 ते 23 जून दरम्यान, लोकांनी गुंतवणुकीसाठी ओपन गोल्ड बाँड सिरीजद्वारे 4,604 कोटी रुपयांचे 7.77 टन सोने खरेदी केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉण्ड जारी केले जातात. सरकारने सॉवरेन गोल्ड बॉण्ड अंतर्गत सोन्याची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली होती.

जोरदार मिळाला परतावा

याउलट, शेअर बाजाराचा बेंचमार्क निर्देशांक निफ्टीने जून महिन्यात 19,189.5 अंकांवर 6 टक्के परतावा दिला. गेल्या आर्थिक वर्षातही सोन्याने उत्कृष्ट परतावा दिला होता. सरकारने 2015 मध्ये फिजिकल सोन्याला पर्याय आणल्याच्या एक वर्ष आणि 7 महिन्यांत 64 सिरीजमध्ये सरासरी 1.72 टन सोन्याची सदस्यता दिसली.

सर्वोच्च किंमत

गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या गोल्ड बॉंण्डची इश्यू किंमत 5,926 रुपये प्रति ग्रॅम होती. गोल्ड बाँड्स आणल्यानंतर ही सर्वाधिक इश्यू किंमत होती. सरकारने सुरू केलेला हा विशेष उपक्रम आहे. सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याच्या उद्देशाने, सरकारी गोल्ड बॉण्ड योजना नोव्हेंबर 2015 मध्ये प्रथम सुरू करण्यात आली. सरकारच्या या योजनेंतर्गत सोन्यात बाजारापेक्षा कमी किमतीत गुंतवणूक करता येते. त्यात केलेल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी सरकार देते.

हेही वाचा :  पंजाब: बीएसएफ जवानाचा साथीदारांवर गोळीबार; पाच जवान शहीद झाल्याची माहिती

सरकारने योजना का सुरू केली?

भौतिक सोन्याची मागणी कमी करणे हा SGB ​​योजनेचा थेट उद्देश  आहे. गोल्ड बाँडची इश्यू किंमत इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) द्वारे 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या आधारावर निर्धारित केली जाते. सोप्या शब्दात, गोल्ड बाँडच्या किमती IBJA ने सबस्क्रिप्शन कालावधीच्या आधीच्या आठवड्याच्या शेवटच्या तीन ट्रेडिंग दिवसांसाठी जारी केलेल्या 999 शुद्धतेच्या सोन्याच्या बंद किंमतीच्या साध्या सरासरीच्या आधारावर निर्धारित केल्या जातात.

किती गुंतवणूक करू शकता?

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोन्याचे रोखे खरेदी करू शकते. तर खरेदीदार किमान एक ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करू शकतो. याशिवाय, कोणत्याही एका आर्थिक वर्षात सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करता येते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सॉवरेन गोल्ड बाँडचे दोन हप्ते जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोल्ड बॉण्डची दुसरी सिरीज11 ते 15 सप्टेंबर दरम्यान जारी करण्यात येणार आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत …

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

SSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या …