शिंदेंकडून पुन्हा खेचून घेणार शिवसेनेचे नाव आणि चिन्ह? सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ तारीख

Shiv Senas Name And Symbol: शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिल्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय रद्द करावा अशी याचिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केली होती. त्यावर आता सुप्रीम कोर्टात 31 जुलैला सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना दणका 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार आक्षेप घेतला होता, मात्र त्याला यश आले नाही.

न्यायालयाने यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून मागितले उत्तर

यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि निवडणूक आयोगाला ठाकरे यांच्या याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे समन्स बजावले होते आणि तीन आठवड्यांनंतर हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतर, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या आणि त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला, परंतु त्याला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस बजावली. 

हेही वाचा :  पृथ्वीवर मनुष्याचं अस्तित्व संकटात, Sperm बाबत संशोधकांच्या अहवालात धक्कादायक माहिती

उद्धव ठाकरेंचा युक्तीवाद

आम्हाला (याचिकाकर्त्याला) पक्ष आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत ठाकरे यांनी असा युक्तिवाद केला.

निवडणूक आयोगाचा चिन्हाचा निर्णय देशाच्या पॅरा 15 अंतर्गत तटस्थ आणि संविधानिक नाही, असा युक्तिवादही याचिकेत पुढे करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

याला निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आले आहे. आयोगाने क्षमतेनुसार एक उत्कृष्ट आदेश पारित केला असून, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह वाटप केले आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..’; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम

AAP MP Swati Maliwal Shocking Claims: आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) खासदार स्वाती मलिवाल …

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर

Iran Helicopter Crash News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी रविवारी हेलिकॉप्टर क्रॅशचा शिकार झाले. ज्यानंतर घटनास्थळी बऱ्याच …