दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र


‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे ऋजुता दिवेकर यांचे पुस्तक प्रा. रेखा दिवेकर यांनी अनुवादित केले आहे. नव्या आहार व जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. सतत बाहेरचं खाणं, घरातल्या जेवणाला नाकं मुरडणं, बैठी जीवनशैली यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत चाललं आहे. अशा परिस्थितीत ‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे पुस्तक पालकांना मोलाचं मार्गदर्शन करणारं आहे. ऋजुता दिवेकर याचं आहारवैशिष्टय़ म्हणजे त्या भारतीय आहारावरच विशेष भर देतात. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्या पालकांच्या मनातील अन्नाबद्दलचा संभ्रम दूर करतात. खाण्यापिण्याच्या साध्या गोष्टीही आपण जटिल करून ठेवल्या आहेत असं त्या सुरुवातीला नमूद करतात. स्थानिक हंगामानुसार आणि पारंपरिक खाणे नेहमी चांगले हे त्या प्रामुख्याने सांगतात. लहानपणापासून ऐकलेल्या काही पारंपरिक गृहीतकांना छेद देत त्याऐवजी मुलांना कोणत्या गोष्टी खायला आवडतील यांची जंत्री त्या देतात. ‘मुलांसाठी आहाराची योग्य निवड’ या प्रकरणात आरोग्यास अपायकारक असलेले पदार्थ कसे ओळखाल याचे नेमके विश्लेषण त्या करतात. जाहिरातींना बळी न पडता आपल्या दृष्टीने जे योग्य असतो तोच आहार घ्या असं त्या सांगतात. त्याची उदाहरणेही देतात. निरोगी, सुदृढ मुलांच्या खाण्याच्या सवयींविषयी चर्चा करताना मुलांनी कोणते पदार्थ खाणे त्यांच्या आरोग्यास उत्तम याबाबतची माहिती यात आहे- जी पालक आणि मुलांना निश्चितच उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा :  IRCTC घेऊन आलीय टूर पॅकेज, बजेटचीही चिंता मिटली

आहाराबरोबरच व्यायाम हासुद्धा मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. त्यासाठी पालकांनीच मुलांसाठी आदर्श घालून द्यावा. पालक व्यायाम करतील तर त्याचा आदर्श मुलं घेतील याची आठवण करून देताना मुलांनी खुल्या मैदानात खेळणं किती आवश्यक आहे हे त्या सांगतात. मुलांनी निरोगी राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाच गोष्टींमध्ये तोल साधण्यासाठी सायकिलग, स्केटिंग, स्कीईंग किंवा जिम्नॅस्टिक्स शिका, मुलांसाठी योगासने उत्तम; पण प्राणायाम, ध्यानधारणा नको असे अनेक सल्ले त्या देतात. मुलांचा आहार सांभाळण्यासाठी खूप उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ – ऋजुता दिवेकर, अनुवाद- प्रा. रेखा दिवेकर, अमेय प्रकाशन, पाने- १७८, किंमत- २५० रुपये

The post दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र appeared first on Loksatta.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …