Samruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर… चालकावर गुन्हा दाखल

Samruddhi Mahamarga Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) शनिवारी रात्री 1 वाजून 26 मिनिटांनी  बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा नजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपुरवरुन ही विदर्भ ट्रॅव्हल्स (Vidarbha Travels) ही बस समृद्धी महामार्गावरुन  पुण्याकडे येत होती. या बसला बुसढाणाजवळ अपघात झाला. सुरुवातीला बसचा टायर फुटल्याने अपघात झाल्याचं बोललं जात होतं. पण वेगात असलेली बसं एका लोखंडी पोलवर जाऊन आढळली. यामुळे ड्रायव्हरचे बसवरचं नियंत्रण सुटलं आणि पलटली. यात बसने पेट घेतला आणि साखर झोपेत असलेल्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे प्रवाशांची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. आता या सर्व मृत प्रवाशांची ओळख पटली आहे. 

चालकावर गुन्हा दाखल
या अपघातात बसचा चालक बचावला आहे. चालक शेख दानिश वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, प्रथम दर्शनी चालकाचीच चूक असल्याने सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात असून चालक दानिश याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

मृतांची  ओळख पटली
मृतांमध्ये चंद्रपूरमधले चार प्रवासी, नागपूरमधले 3, वर्ध्यातील सर्वाधिक 9 प्रवासी, पुणे 3, वाशिम 2 सेलूतील एका प्रवशाचा समावेश आहे. 

हेही वाचा :  साडी नेसल्यावर जान्हवी कपूर दिसते हुबेहूब आईसारखी, साडीतले ग्लॅमरस लुक पाहून येते श्रीदेवीची आठवण

तेजस पोफळे – चंद्रपूर 

तुषार करण भूतनवरे – झेडसी सेलू

वृषाली वनकर – चंद्रपूर 

शोभा वनकर – चंद्रपूर

ओवी वनकर – चंद्रपूर

ईशांत गुप्ता – नागपूर

सृजल सोनवणे – यवतमाळ

तनिषा तायडे – वर्धा

तेजू राऊत – अल्लीपूर वर्धा

कैलास गंगावणे – पुणे

 कांचन गंगावणे – पुणे

 सई गंगावणे – पुणे 

संजीवनी गोठे – वर्धा 

सुशील दिनकर खेळकर – वर्धा

गुडिया शेख – नागपूर

कौस्तुभ काळे – नागपूर 

मनीषा बहाळे – वाशिम 

संजय बहाळे – वाशिम 

राधिका खडसे – वर्धा 

श्रेया वंजारी – वर्धा

 प्रथमेश खोडे – वर्धा 

अवंतिका पोहनकर – वर्धा 

निखिल पाते – वर्धा

अशी मृत पावलेल्या प्रवाशांची नावे आहेत.

आरटीओचा अहवाल
समृद्धीवरील अपघाताचा अमरावती RTO ने अहवाल सादर केलाय…या अहवालात टायर फुटून अपघात झाला नसल्याचं म्हटलंय…बस उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी पोलवर जाऊन आढळली…त्यामुळे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडर आदळली…यामुळे वेगात असलेल्या बसच्या डिझेलची टाकी फुटून पेट घेतल्याचं अहवालात म्हटलंय…



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …