“तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे”, PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास करत प्रवाशांना सुखद धक्का दिला. नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी मेट्रोला (Delhi Metro) पसंती दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या. 

दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची माहिती दिली. ओटीटी, नव्या सीरिज यासंबंधी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्याचं ते म्हणाले. 

“येथील विद्यार्थ्यांप्रमाणे मीदेखील आज मेट्रोन प्रवास केला. विद्यार्थ्यांकडे बोलण्यासाठी फार विषय आहेत. विज्ञानापासून ते ओटीटीवरील नवीन सीरिजपर्यंत ते कोणत्याही विषयावर चर्चा करु शकतात,” अशा शब्दांत नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. 

“विद्यार्थी कोणत्याही विषयावर अथकपणे चर्चा करु शकतात. कोणता चित्रपट पाहिला, ओटीटीवर कोणती वेब सीरिज चांगली आहे, ती रिल पाहिली की नाही? चर्चा करण्यासाठी हा विषयांचा समुद्रच आहे,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा :  उरले फक्त काही तास...; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विरला आपल्या मेट्रो प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. सहप्रवासी म्हणून तरुण सोबत असल्याचा आनंद आहे असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदी मेट्रोतून प्रवास करत असल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व्हिडीओत नरेंद्र मोदी प्रवाशांशी गप्पा मारताना दिसत आहेत. 

नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विद्यापीठात तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यासह काही कॉफी टेबल पुस्तकांचंही प्रकाशन केलं. 

या इमारती टेक्नॉलॉजी फॅकल्टी, कॉम्प्युटर सेंटर आणि शैक्षणिक ब्लॉकसाठी आहेत. या इमारती अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह 7 पेक्षा जास्त मजल्यांच्या असतील.

हेही वाचा :  'महाराष्ट्रात शब्दांची अदला बदल झाली अन्...'; मराठा, धनगर आरक्षणप्रश्नी उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसचे संचालक प्रकाश सिंग यांनी विद्यापीठात कॉम्प्युटर सेंटर आहे, मात्र ते फक्त दोन मजल्यांचं आहे असं सांगितलं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ही चोरी बघून तुम्ही ‘धूम’मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

Dhoom Style Theft: कोणाचं वाईट करायला जाऊ नका, कोणी ना कोणी तरी आपल्याला बघत असतो, …

Pune Porsche Accident : ‘आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि…’ ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि …