जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकांना सुट्टी; फक्त अर्धा महिनाच कामं चालणार

Bank Holidays list in July : आर्थिक व्यवहारांना अधिक सुकर पद्धतींनी सर्वसामान्यांपर्यंत आणणाऱ्या, विविध ठेवींच्या योजना, कर्ज यांसारख्या सुविधासुद्धा बँकांकडून पुरवण्यात येतात. मुख्य म्हणजे काही कामं ऑनलाईन पद्धतींनी होत असली तरीही काही कामांसाठी मात्र बँकेत जायची वेळ सर्वांवरच येते. जुलै महिन्यात तुम्ही बँकेची अशीच काही कामं नजरेत ठेवली असतील कर आधी बँकांचं वेळापत्रक पाहून घ्या. 

नव्या महिन्यामध्ये ज्याप्रमाणं काही नियमांमध्ये बदल होतात आणि त्याचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतात अगदी त्याचप्रमाणं बँकांच्या वेळापत्रकातही बदल होणार असून, त्याचे परिणाम सर्वसामान्यांवर काही अंशी होणार आहेत. 

दर महिन्याप्रमाणं यावेळीसुद्धा भारतीय रिझर्व्ह बँक RBI कडून बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे (Bank Holiday In July). जिथं येत्या महिन्यात बँता तब्बल 15 दिवस बंद असणार असल्याची माहिती आता स्पष्ट होत आहे. त्यामुळं येत्या दिवसांत काही कारणांनी बँकांमध्ये जाणार असाल, तर आधी या तारखा लक्षात ठेवा. 

 

आताच यादी पाहा 

जुलै महिन्यात बँका 15 दिवस बंद असल्या तरीही देभरातील बँका सरसकट 15 दिवसांसाठी बंद राहणार नसून राज्याराज्यानुसार या सुट्ट्यांमध्येही बदल होताना दिसणार आहेत. विविध राज्यामध्ये असणारे विविध सण- उत्सव, सरकारी सुट्ट्या यांनुसार बँकांच्याही सुट्ट्या निर्धारित करण्यात येतात. त्यामुळं तुमचं ज्या बँकेत खातं आहे आणि नेमकं पुढच्याच महिन्यात बँकेत तुमचं एखादं काम असेल तर आधी आरबीआयची ही यादी पाहाच. ही यादी तुम्ही https://www.rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. एक बाब लक्षात घेण्याजोगी ती, म्हणजे बँका जरी बंद असल्या तरीही काही कामं वगळता त्यांच्या ऑनलाईन सेवांच्या आधारे तुम्ही शक्य ते व्यवहार पूर्ण करू शकता. 

हेही वाचा :  Pune: ज्याने 75 लाखांची सुपारी दिली तो आरोपी बाप निघाला! प्रॉपर्टीसाठी मुलाच्या जीवावर उठला

कोणकोणत्या दिवशी बँका बंद? 

2 जुलै, रविवार – सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू) 
5 जुलै, बुधवार – गुरु हरगोविंदजी जयंती (जम्मू आणि श्रीनगर)
6 जुलै, गुरुवार – एमएचआयपी दिवस (मिझोरम)
8 जुलै, शनिवार – दुसरा शनिवार/ साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू)
9 जुलै, रविवार –  सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू) 
11 जुलै, मंगळवार – केर पूजा (त्रिपुरा)
13 जुलै, गुरुवार – भानु जयंती (सिक्कीम) 
16 जुलै, रविवार – सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू) 
17 जुलै, सोमवार – यू तिरोट सिंग डे (मेघालय)
21 जुलै, शुक्रवार – द्रुक्पा त्शे जी (सिक्कीम)
23 जुलै, रविवार – सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू) 
28 जुलै, शुक्रवार – आशूर (जम्मू आणि श्रीनगर)
29 जुलै, शनिवार – मोहरम (ताजिया) / राजस्थान, उत्तर प्रदेश, बंगाल, नई दिल्ली, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, मिजोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, तेलंगाना
30 जुलै, रविवार – सर्व बँकांना साप्ताहिक सुट्टी (सर्व राज्यांमध्ये लागू) 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद …

छ. संभाजी नगरात ‘लापता लेडीज’, गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक

विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजी नगर:  घरातून रागाने, कौटुंबिक कारणातून, पती-पत्नी विसंवाद, अनैतिक …