जमीन खरेदीसाठी लाखोंचा खर्च करण्यापूर्वी एकदा ‘ही’ वेबसाईट पाहाच; क्षणात समोर येईल सविस्तर माहिती

Land Purchase Website: कितीही आलिशान घर असलं, कितीही संपत्ती असली तरीही जमीन खरेदी करून त्यावर मनाजोगं बांधकाम करण्याचा अनेकांचाच मानस असतो. काहींना आवडीच्या एखाद्या खेड्यात जमीन खरेदी करत तिथं बाग तयार करायची असते तर, काहींना चक्क शेतीही करायची असते. मुळात या गोष्टी आकारास येण्यासाठी जमिनीचा तुकडा योग्य दरात खरेदी केला जाणंही तितकंच महत्त्वाचं. पण, बऱ्याचदा असं होताना दिसत नाही. 

गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि मुंबई- उपनगरांचा मुद्दा नजरेत घ्यायचा झाल्यास इथं असणाऱ्या जमिनींचे दर प्रचंड मोठ्या फरकानं वाढले आहेत. यामध्ये काहींनी खरेदी करण्यासाठी घाई केल्यामुळं त्यांचं नुकसानही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जमिनीच्या व्यवयाहारांमध्ये अनेक तोतयांनी चुकीच्या पद्धतीनं पैसे बळकावल्याची प्रकरणं तुम्हीही पाहिली असतील. त्यामुळं जेव्हाजेव्हा जमीन खरेदीचा मुद्दा निघतो तेव्हातेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अनिवार्य आहे. 

जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? 

जेव्हा अमुक एखादी व्यक्ती जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी एक पाऊल पुढे टाकते तेव्हा त्या व्यक्तीनं काही गोष्टींबाबत काळजी घेणं अपेक्षित असतं. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ती जमीन कोणाची आहे, तिचं लोकेशन काय आहे आणि तिचं एकूण क्षेत्रफळ किती आहे. या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष झाल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. 

हेही वाचा :  "तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये...", 'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीने केला खुलासा | aai kuthe kay karte fame ashvini mahangade talks about her battle with depression and what kept her going

जमीन खरेदी व्यवहारांमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे अतीघाई टाळणं. बऱ्याचदा घाई केल्यामुळं या व्यवहारांमध्ये माहितीशी छेडछाड केली जाते. बऱ्याचदा चुकीची माहितीही दिली जाते. ज्यामुळं तुम्हाला लाखोंचा फटका बसू शकतो. या साऱ्यामध्ये तुम्हाला एका संकेतस्थळाची बरीच मदत होऊ शकते.  

एक Smart Trick करेल मदत…. 

तुम्हीही जमीन व्यवहारामध्ये पैसे गुंतवण्याच्या विचारात असाल, तर फार काही करण्याची गरज नाही. फक्त Google Search मध्ये जाऊन तुमच्या राज्याचं नाव टाईप करून सोबत IG सुद्धा टाईप करा. इतकं करून सर्च बटणावर क्लिक करा. लगेचच तुमच्यासमोर स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशनची वेबसाईट सुरु होईल. तुम्हाला इथं अनेक पर्याय मिळतील. 

तुम्ही खरेदी करत असणाऱ्या जमिनीची माहिती देण्याचा पर्यायही इथं उपलब्ध असेल. त्यातही तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास रजिस्ट्रेशन क्रमांक भरण्याचा पर्याय दिसेल. तिथं हा क्रमांक टाईप करून Enter केल्यास तुमच्यासमोर अपेक्षित जमिनीची सर्व माहिती असेल. सरकारी संकेतस्थळ असल्यामुळं इथं तुमची फसवणूकही टळते. 

सर्व माहितीची पूर्तता केल्यानंतर या संकेतस्थळावरून तुम्हाला सर्व अपेक्षित माहिती मिळेल. जिथं ती जमीन कोणाच्या नावावर आहे, तिची खरेदी केव्हाकेव्हा झाली, त्या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती आहे ही आणि अशी इतर माहिती तुम्हाला इथं मिळेल. त्यामुळं इथून पुढं तुम्हीही अशाच जमीन खरेदीचा व्यवहार करणार असाल तर, सर्वप्रथम या संकेतस्थळावरून माहिती नक्की मिळवा. 

हेही वाचा :  'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेला जाग, तीन दिवसात ‘इतक्या’ होर्डिंगवर कारवाई

Navi Mumbai Illegal Hoarding : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 …

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …