ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी ED ने धाड टाकल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “ज्यांचे संबंध…”

Devendra Fadnavis on ED Raid: कोव्हिड सेंटर कथित घोटाळा (Covid Centre Scam) प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आज 10 ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Sooraj Chavan) यांचाही समावेश आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आलं असं सांगितलं. तसंच आमदार गीता जैन यांनी अधिकाऱ्याच्या कानाखाली लगावलेल्या प्रकरणावरही भाष्य केलं.

ईडीने ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाणांच्या घरावरही ईडीने धाड टाकली आहे. तर अधिकारी संजीव जैस्वाल, नितीन गुरव, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, संजय शाह यांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. कोव्हिड सेंटर बनवण्यासाठी वापरलेल्या साहित्यात घोटाळा केल्याचा आरोप यांच्यावर आहे. या संबंधित कंपन्यांकडून फायदा मिळवल्याचा आरोप असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “नेमकी काय कारवाई सुरु आहे याबद्दल मला माहिती नाही. पण ज्यावेळी मुंबई महापालिकेत कोविड सेंटर सुरु कऱण्यात आले आणि त्यातील घोटाळा समोर आल्यानंतर धक्कादायक माहिती हाती आली होती. कशाप्रकारे कोणताही अनुभव नसणाऱ्या कंपन्या तयार झाल्या आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यात आलं, त्यातून कसे मृत्यू झाली याची सर्वांना कल्पना आहे. पुण्यात तर एका पत्रकाराचा मृत्यू झाला. त्यामुळे चौकशी सुरु होती. आता ती चौकशी कुठपर्यंत पोहोचली आहे, छाप्यात काय मिळालं आहे याची मला कल्पना नाही”. 

हेही वाचा :  मोठी बातमी! इम्रान खान यांच्या घऱात 30 ते 40 दहशतवादी; एकच खळबळ, पोलिसांचा संपूर्ण परिसराला घेराव

दरम्यान आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही धाड टाकण्यात आल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “ज्यांचा संबंध असेल त्यांच्यावरच धाड टाकण्यात येत असेल. यासंदर्भात ईडीच अधिकृत माहिती देऊ शकेल”.

“लोकप्रतिनिधींनी संयम बाळगला पाहिजे. कधीतरी संताप होऊ शकतो, रान अनावर होऊ शकतो. पण तरीही त्यांनी संयम बाळगून कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणं योग्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी गीता जैन प्रकरणावर बोलताना सांगितलं. 

गीता जैन प्रकरण काय?

आमदार गीता जैन यांनी मंगळवारी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भररस्त्यात मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काशिमीरा येथील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. याअंतर्गत एका झोपड्डीपट्टी बांधकामावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. पण बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यानंतर गीता जैन तिथे पोहोचल्या होत्या. गीता जैन अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत असताना कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हे हसत होते. त्यामुळे संतप्त जैन यांनी थेट पाटील यांच्या अंगावर जात त्याचा शर्ट खेचला आणि श्रीमुखात लगावली.

हेही वाचा :  Viral Video : एक चूक अन् बस थेट दरीत; थरकाप उडवणाऱ्या रस्त्यानं प्रवाशांना नेणारा ड्रायव्हर देव नाही तर आणखी कोण?



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..’, रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, ‘आपण अजून..’

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान …

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या …