Ashadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!

Ashadhi Ekadashi : 
पंढरीची वारी जयाचिये कुळीं ।
त्याची पायधुळी लागो मज….
असं म्हणत संतमंडळींच्या पालख्यांनी पंढरपुरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं आहे. नुकतंच संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली याच्या पालख्याही विठ्ठल भेटीसाठी मार्गस्थ झाल्या असून, त्यासोबतच लाखोंच्या संख्येनं वारकरीसुद्धा पायवारीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी (12 जून 2023) रोजी या दोन्ही पालख्या पुण्यात दाखल होत आहेत. (Ashadhi ekadashi wari 2023 Pune traffic rules changed latest updates saint dnyaneshwar mauli tukaram maharaj palkhi )

संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यात निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामाला असेल, तर माऊलींची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिरात दोन दिवसांसाठी मुक्कामी असेल. एक आणि दोन दिवसांच्या मुक्कामानंतर या पालख्या शहराचा निरोप घेतील. दरम्यानल पालख्या मुक्कामी असताना त्यासोबत येणारे वारकरी आणि दिंड्या यांच्या मुक्कामाची सर्व व्यवस्था या भागात करण्यात आल्याचं कळत आहे. पायवारी सध्या पुण्यात असल्यामुळं शहराच्या वाहतुकीवरही त्याचे थेट परिणाम झाले असून, नागरिकांना दरम्यानच्या काळात पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

पुण्यात येताच या पालखी मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार न होऊ देण्यासाठी यंत्रणांची नजर असणार आहे. यासाठी CCTV आणि ड्रोनचा वापर पोलीस यंत्रणा करणार आहे. 

हेही वाचा :  Ashadhi Ekadashi 2023 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला! आजीचा हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

Live Location ची ‘अशी’ होईल मदत… 

यंदाच्या वर्षी लाईव्ह लोकेशनच्या माध्यमातून नागरिकांना पालखी सोहळ्याची माहिती मिळणार आहे. शिवाय वाहतुकीचं नियोजन करणंही शक्य होणार आहे.  

कोणत्या वाहतूक मार्गांमध्ये बदल, कोणते मार्ग बदलले? 

– लक्ष्मी रस्त्याऐवजी शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता या मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. 
– टिळक चौक ते वीर चापेकर चौकासाठीच्या रस्त्यात पर्यायी मार्ह म्हणून शास्त्री रस्ता, म्हात्रे पुलाचा वापर करावा. 
– गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक या शिवाजी रस्त्यावरील भागाची वाहतूक बंद राहणार असून, त्याऐवजी कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता या मार्गानं प्रवास करावा लागणार आहे. 
– फर्ग्युसन रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक या रस्त्यावरील वाहतूकीतही बदल झाले असून, वारीदरम्यान नागरिकांनी कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स चा वापर करावा. 
– गणेशखिंड रस्त्यावरी वाहतुकीवरही परिणाम होणार असून,  रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग या मार्गांचा नागरिकांनी वापर करावा. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘भुजबळ नेहमी BJP ला डिवचतात, जरांगेंचं आंदोलन सुरु असताना सुद्धा..’; निलेश राणे संतापले

Chhagan Bhujabal Demanded For Seats: लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान अद्याप झालेलं नसतानाच दिवाळीच्या आसपास होणाऱ्या …

सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ; 1 आणि 10 ग्रॅमचा भाव जाणून घ्या

Gold Price Today in Maharashtra: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र आहे. मंगळवारी …