तुम्ही मंदिरात जात आहात?, आता महाराष्ट्रातील 114 मंदिरांमध्ये ‘ड्रेसकोड’

Maharashtra Temples Dress Code News : तुम्ही मंदिरात जात असाल तर तुम्हाला आता एक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कोणताही ड्रेस घालून तुम्हाला आता मंदिरात जाता येणार नाही. कारण महाराष्ट्र मंदिर महासंघाने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ड्रेसकोड लागू होणार आहे. त्यामुळे मंदिरात जाताना तुम्हाला कपड्यांच्याबाबतील सतर्क राहावे लागणार आहे. (Devotees To Have dress Code in Maharashtra )

जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहमदनगर यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण 114 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये आज मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील 18 मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक  सुनील घनवट यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने मुंबईमधील श्री शीतलादेवी मंदिरात याबाबत निर्णय घेण्यात आला. अशी माहिती महासंघाने पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जीवदानी मंदिराचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर, कडाव गणपती मंदिराचे विश्वस्त (कर्जत)  विनायक उपाध्ये, केरलीय क्षेत्रपरिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर हे उपस्थित होते. वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार्‍या मंदिरांच्या नावांची घोषणा यावेळी सुनील घनवट यांनी केली.

हेही वाचा :  केसात गजरा, करारी नजर जान्हवी कपूरचा असा लुक की श्रीदेवीचाच भास

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने 7 जून 2023 या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांतील मंदिरांच्या ट्रस्टींची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपस्थित सर्व मंदिरांच्या ट्रस्टींनी मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याला ठराव एकमताने संमत केला. 

वर्ष 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये ‘जीन्स पँट’,‘टी-शर्ट’, भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू होता. त्याचधर्तीवर आता मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्याचा विचार आहे. 

देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खासगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. त्याप्रमाणे मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, असे सुनील घनवट यांनी म्हटलेय.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘लाखात एक होती माझी मुलगी’ मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा… कोण होती अश्विनी कोष्टा?

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात पोलिसांवर अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा …

Pune Porsche Accident: ‘त्या’ मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावा

Pune Porsche Accident News: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे …