हायवेवर बाईकचा ब्रेकच लागला नाही, गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात, पतीचा मृत्यू

प्रवीण तांडेकर, झी मीडिया

Bhandara Accident News: भंडारा जिल्ह्याच्या साकोली – लाखांदूर रस्त्यावरील कुंबली गावाजवळ दुचाकीने ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Husband Died In Bhandara Accident)

दुचाकीचा ब्रेक फेल झाला

साकोली – लाखांदूर हा वर्दळीचा मार्ग आहे. साकोली वरुण गडचिरोली, चंद्रपूर येथे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे दिवसभर वाहनाची ये-जा जास्त असते. आज सकाळच्या सुमारास दुचाकीवरुन पती- पत्नी जात असताना कुंबली गावाजवळ दुचाकी चालकाचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे त्याला दुचाकीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळं सरळ दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जाऊन आदळली. 

पतीचा मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की यात दोघे पती-पत्नी खाली कोसळले असून त्यांना जबर मार बसला आहे. गावकऱ्यांनी दोघांना साकोली येथील रूग्णालयात दाखल केलं आहे. पण पतीला जास्त मार लागला असल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळं रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. तर पत्नी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, अपघात झालेल्या पती-पत्नीचे नाव अद्याप समोर आलेले नाहीये. 

हेही वाचा :  टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीला जलसमाधी; 17 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी; VIDEO VIRAL

पालघरमध्ये टेम्पोचा अपघात

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी येथील टोल तपासणी नाक्यावरील टोल चुकवण्यासाठी मध्यरात्री सायवण कासा चारोटी या आडमार्गाचा वापर करणाऱ्या टेम्पोचा पावन फाटा येथे भीषण अपघात झाला आहे . झिंक डस्ट अल्ट्रा फाईंड नामक पदार्थाचे डबे वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

रात्रीच्या सुमारास अवजड वाहन दापचरी येथील टोल चुकवण्यासाठी याच आडमार्गाचा वापर करत असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे . मात्र दुसऱ्या बाजूला आरटीओ विभाग आणि पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय. 

ठाण्यात पादचाऱ्याला कारची धडक

ठाण्यातील पोखरण रोड नंबर 2 येथे भरधाव वेगाने जात असलेल्या कारची धडक बसून रस्त्याने चाललेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. विशेष म्हणजे कार चालवणारा हा 18 ते 19 वर्षे अल्पवयीन तरुण असून अपघात झाल्यानंतर तो घाबरून कार सोडून पळून गेला होता. भरधाव वेगाने कार चालवत असताना कारवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हेही वाचा :  इनोव्हा कार आणि 11 लाखांसाठी महिलेला All Out पाजले, पतीनेच रचला होता कट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …