Royal Enfield ला विसरुन जाल! बाजारात आली Harley-Davidson ची जबरदस्त आणि स्वस्त Made In India बाईक

Harley-Davidson X 440: Harley-Davidson ने Hero Motocorp शी हातमिळवणी करत तयार केलेली बहुप्रतिक्षित बाईक अखेर समोर आली आहे. कंपनीने या बाईकचे अधिकृत फोटो जाहीर केले आहेत. कंपनीने Harley-Davidson X 440 बाईकचा पहिला लूक समोर आणला असून तिचं डिझाइन आणि लूक XR 1200 पासून प्रेरित असल्याचं दिसत आहे. ही बाईक बाजारात आल्यानंतर मुख्यत्वे एंट्री लेव्हल मध्यम वजनाच्या क्रूझररोडस्टर्स बनवणाऱ्या Royal Enfield आणि Jawa या ब्रँड्सना टक्कर देईल. 

जवळपास दोन महिन्यांपूर्वी या बाईकचे काही फोटो समोर आले होते. ही Harley-Davidson ची पहिली बाईक आहे जी पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे. याशिवाय Harley-Davidson आणि Hero Motocorp च्या हातमिळवणीनंतर तयार करण्यात आलेली पहिली बाईक आहे. अर्गोनॉमिक्सबद्दल सांगायचे तर, हे कोणत्याही फॉरवर्ड-सेट फूटपेगशिवाय किंवा स्वीप्ट बॅक हँडलबारशिवाय ऑफर करण्यात आलं आहे, जे तुम्ही क्रूझरवर पाहता. त्याऐवजी कंपनीने या बाइकमध्ये मिड-सेट फूटपेग आणि फ्लॅट हँडलबार दिला आहे. पण या बाईकचा लुक खूपच स्पोर्टी आहे.

Harley-Davidson ने या बाईकचं स्टायलिंग केलं आहे. तर इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि पूर्णपणे डेव्हलप करण्याचं काम हिरो मोटोकॉर्पकडून केलं जात आहे. ही बाईक अत्यंत स्टायलिश दिसत असून त्याला Harley-Davidson चा स्पर्श आहे. फोटोच्या माध्यमातून कंपनीने या बाईकमध्ये डे-टाइम रनिंग लाइट्सचा (DRL) वापर केल्याचं दिसत आहे. यावर Harley-Davidson असं लिहिण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा

Harley-Davidson X 440 ला मॉडर्न रेट्रो लूक देण्यात आला आहे. कंपनीने या बाईकमध्ये 400 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर इंजिनचा वापर केला आहे, जो 30-35 बीएचपीची पॉवर जनरेट करतं. याला 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडण्यात येणार आहे. यामध्ये स्लिपर क्लचला स्टँडर्ड म्हणून जोडलं जाईल अशी आशा आहे. रिपोर्टच्या आधारे बोलायचं गेल्यास हे इंजिन सध्याच्या Royal Enfield च्या बेस्ट सेलिंग मॉडल Classic 350 मध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनपेक्षा जास्त पॉवरफूल असेल. जो 20bhp ची पॉवर आणि 27Nm चा टॉर्क जनरेट करते. 

बाईकच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्कच्या जागी USD फोर्क पाहायला मिळत आहे. मागील भाग यामुळे जास्त ट्रेडिशनल दिसत आहे. बाईकच्या मागील बाजूला ट्वीन शॉक ऑब्झर्व्हर देण्यात आले आहेत. कंपनीने बाईकमध्ये MRF चे टायर वापरले आहेत. याच्या पुढील बाजूला 19 इंच तर मागील बाजूला 17 इंचाचा टायर देण्यात आला आहे. 

या बाईकच्या निर्मितीत Hero Motocorp सहभागी असल्याने कमीत कमी किंमतीत बाजारात आणलं जाऊ शकतं अशी आशा व्यक्त होत आहे. बाईकची किंमत 2.5 ते 3 लाखांपर्यंत असेल असे अंदाज आहेत. जुलै महिन्यात ही बाईक लाँच केली जाऊ शकते. 

हेही वाचा :  लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Bajaj ची दमदार Pulsar NS400 लाँचिंगच्या तयारीत, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Bajaj Pulsar NS400: भारतीय बाजारपेठेत दुचाकींमध्ये पल्सरची एक वेगळी ओळख आणि दबदबा आहे. आजही लोक …

Pixel पासून iPhone 14 पर्यंत; घसघशीत सवलतीसह खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन

Smartpone On Lowest Price In Flipkart Amazon : येत्या काही दिवसांमध्ये तुम्हीही स्मार्टफोन, चांगला आणि …