धक्कादायक ! रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पोहोचला, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने कापला प्रायव्हेट पार्ट

Hernia Operation : डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी गेलेल्या रुग्णाबाबत धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर आता हे प्रकरण पोलिसात पोहोचले आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे. दरम्यान, ऑपरेशनच्या नावाखाली डॉक्टरने प्रायव्हेट पार्ट कापल्याने रुग्णाला धक्का बसला आहे. अलीकडेच बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सक्रा पोलीस स्टेशन परिसरातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी एका व्यक्तीवर हर्नियाचे ऑपरेशन केले, परंतु त्यांनी ते कापून त्याचे हायड्रोसेल काढले. एआर श्रीवास्तव असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय संचालक ब्रिजबिहारी चौधरी आणि नर्स सविता ठाकूर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधिकारी आणि पीडित रुग्णांकडून काय सांगितले? 

संपूर्ण प्रकरणावर मुझफ्फरपूर शहर एसपी अरविंद प्रताप सिंह यांनी सांगितले की, पीडितेच्यावतीने साक्रा पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आला आहे. एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास करुन पुढील कारवाई केली जाईल. पीडित कमलेश महतोची पत्नी संगीता देवी यांनी तिघांविरुद्ध साक्रा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, बळजबरीने बोलावून ऑपरेशन करण्यात आले आणि चुकीचे ऑपरेशन करुन हायड्रोसील कापून काढण्यात आले आहे. या प्रकरणी पीडितेच्यावतीने साक्रा पोलीस ठाण्यात अर्ज देण्यात आला आहे.  

हेही वाचा :  Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नव्या जबाबदारीनंतर सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया

ऑपरेशननंतर पोट फुगले

शिवशक्ती नर्सिंग होम असे रुग्णालयाचे नाव आहे. सकरा वाजिद येथील रहिवासी कमलेश महातो यांच्यावर 10 एप्रिल रोजी हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. नर्सिंग होममध्ये हर्नियावर योग्य उपचार झाले नाहीत, तर कमलेशचे हायड्रोसेल कापून काढण्यात आले. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावली होती.  पीडित रुग्णाच्या पत्नीने सांगितले की, 7 एप्रिल रोजी पतीचे हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर त्याचे पोट फुगले. नर्सला सांगितल्यावर तिने सांगितले की गॅस तयार झाला आहे, तो इंजेक्शनने काढला जाईल.

रुग्णाचे हायड्रोसेल कापून काढले

हर्नियाच्या ऑपरेशननंतर रुग्णाच्या पोटात आणि हायड्रोसेलला सूज येऊ लागली होती. प्रकृती बिघडायला लागल्यावर दोन दिवसांनी पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केले. यादरम्यान रुग्णाचे हायड्रोसेलही कापून काढण्यात आले. दरम्यान, रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची परवानगीही देण्यात आली नव्हती. मात्र, त्यानंतरही रुग्णाला आराम मिळाला नाही. त्याची प्रकृती बिघडू लागली. नातेवाइकांना त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची इच्छा होती, मात्र रुग्णालयातील कर्मचारी त्याला जाऊ देत नव्हते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मदतीने त्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

डॉक्टरच्या निष्काळजीपणाची माहिती मीडिया आणि प्रशासनाला मिळाली. त्यानंतर साक्रा येथील खासगी रुग्णालयातील लोकांनी पलायन केले. पीडित रुग्णाला धमक्या दिल्या जात होत्या. त्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

हेही वाचा :  मनोज जरांगेंनी शेवटचा डाव टाकत सरकारला धरलं वेठीस, मुंबईला निघण्यापूर्वी केली ही घोषणा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

5 नव्हे तर आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर सुरू होतंय प्रकल्पाचे काम

Virar Alibaug Mulitmodal Corridor: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या …

‘पुण्यातील ससून रुग्णालय ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे का? आधी ललित पाटील, आता डॉक्टरांनी..’

Sasun Hospital Doctor Arrested: पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की ‘गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा’ आहे? असा …