16 व्या वर्षी डॉक्टर, 22 वर्षात IAS बनला; सर्व सोडून सुरु केली 15000 कोटींची कंपनी

Success Story : मेहनत,  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येवू शकते. राजस्थानच्या  रोमन सैनी (Roman Saini) नावाच्या तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.  रोमन हा इतका प्रतिभाशाली आहे की तो वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर बनला. यानंतर वयाच्या 22 व्या वर्षात तो IAS ऑफिसर बनला. मात्र, रोमनचे ध्येय काही तरी वेगळेच होते.  आपले ध्येय गाठण्यासाठी त्याने डॉक्‍टर आणि IAS सारखी प्रतिष्ठित नोकरी सोडली. जिद्दीच्या जोरावर त्याने 15000 कोटींची कंपनी उभी केली आहे. 

आपलं ध्येय गाठण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतात. रोमन याने मात्र, आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यात  डॉक्‍टर आणि IAS आधिकारी यासारखी प्रतिष्ठित  आणि कठोर मेहनत असलेली पद प्राप्त केली. मात्र, या पलीकडे जाऊन  मेहनत आणि  प्रयत्न केल्यास सर्व काही शक्य आहे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

असा बनला डॉक्टर

रोमन सैनी हा मुळचा राजस्थानसारख्या छोट्या शहरात राहणारा आहे. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्याने एम्ससारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. रोमनने एम्सची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 21 व्या वर्षात त्याला डॉक्टरची पदवी मिळाली. डॉक्टरेट पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एम्सच्या एनडीडीटीसीमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :  'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनले

डॉक्टरची पदवी मिळाल्यानंतर एम्ससारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तो काम करत होता. येथील नोकरी सोडून त्याने  यूपीएससीची तयारी सुरू केली. एक वर्षाच्या मेहनतीनंतर त्याने आयएएसची परीक्षा पास केली. वयाच्या 22 व्या वर्षी तो UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी बनला. 1 वर्ष 8 महिने सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.

का सुरु केली  15000 कोटींची कंपनी?

डॉक्‍टर आणि IAS अधिकारी यासरख्या प्रतिष्ठीत पदाच्या नोकरीचा मोहन न बाळगता रोमननने आपले वेगळे उद्दिष्ट निश्तित केले. 2011 मध्ये एका मेडिकल कॅम्पदरम्यान आरोग्य, स्वच्छता, पाणी या सारख्या समस्यांची त्याला जाणीव झाली. डॉक्टर या समस्या सोडवू शकत नाही यामुळे त्याने प्रशासकीय अधिकारी बनण्याचा निर्णय घेतला. यानंतर रोमन याने शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने आपल्या सरकारी नोकरीचाही राजीनामा दिला. गौरव मुंजाल आणि हेमेश सिंग या आपल्या दोन मित्रांच्या मदतीने त्याने बेंगळुरूमध्ये अनॅकॅडमी स्टार्टअप सुरू केले. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांना कोचींग देण्याचे काम त्याचे हे स्टार्टअप करते. अनॅकॅडमीच्या माध्यमातून ऑनलाइन ट्युटरिंग प्लॅटफॉर्म रोनिलने सुरू केला आहे. अल्पवधीतच एड टेक प्लॅटफॉर्म Unacademy या कंपनीने 15000 कोटींची डोलारा उभारा केला आहे.  यूपीएससीच्या तयारीसाठी सुरू केलेली ही कंपनी आता वैद्यकीय, अभियांत्रिकीत करिअर करु इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. इतकतचं नाही तर ही कंपनी शालेय स्तरावर देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. 

हेही वाचा :  'एवढी मस्ती कुठून आली?', छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, म्हणाले "गोपीनाथ मुंडे असते तर..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

Maharastra Politics : ‘तानाजी सावंत यांचा तातडीने राजीनामा घ्या, त्यांनी…’, रविंद्र धंगेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये आलिशान कारनं (Pune Porsche Accident) चिरडून दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार …