Amazon Prime चा यूजर्सना दे धक्का! योजनांची किंमत…

Amazon Prime : अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिपसाठी याआधी काही सवलत दिली होती. मात्र, आता अ‍ॅमेझॉनने आपल्या प्राइम मेंबरशिपची किंमत पुन्हा बदलली आहे. त्यामुळे याचा फटका यूजर्सना बसणार आहे. आता भारतात Amazon प्राइम मेंबरशिपची किंमत एका महिन्यासाठी 299 रुपयांपासून सुरु झाली आहे. पूर्वी ती 179 रुपये होती. यात आता वाढ करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी, ई-कॉमर्स  अ‍ॅमेझॉन कंपनीने अधिक खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्राइम मेंबरशिपवर सवलतीच्या दरांची घोषणा केली होती. आता कंपनीने आपल्या योजनांत बदल केला आहे. जुन्या दरांचा विचार करता आता नवीन दरात मोठी वाढ केली आहे. तुम्ही अ‍ॅमेझॉनचे सबस्क्रिप्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील.

अ‍ॅमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत वाढली 

Amazon प्राइम मेंबरशिपची किंमत आता भारतात एका महिन्यासाठी 299 रुपयांपासून सुरु झाली आहे. याआधी डिसेंबर 2021 मध्ये घोषित केल्यानुसार ती 179 रुपये होती. यात आता वाढ करण्यात आली. त्यामुळे त्यामुळे ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणराआहे. कंपनीने मेंबरशिपची किंमत 120 रुपयांनी वाढवली आहे. 

हेही वाचा :  Google's 25th birthday : गॅरेजमध्ये सुरूवात आज मल्टी-बिलियन कंपनी; 'गुगल' नावाचा भन्नाट किस्सा माहितीये का?

असे असणार अ‍ॅमेझॉन प्राइमचे प्लान

अ‍ॅमेझॉन प्राइमने ग्राहकांना मोठा झटका देताना  प्राइम मेंबरशिपची किंमत वाढवली आहे. आता तुम्हाला तीन महिन्यांच्या प्लानसाठी मेझॉन प्राइमचा तिमाही प्लान  599 रुपयांमध्ये मिळेल. यापूर्वी या प्लानची किंमत 459 रुपये होती. या जुन्या प्लानमध्ये,  140 रुपयांची वाढ केली आहे. एक महिना आणि तिमाही प्लानच्या किंमतीत वाढविल्या असल्या तरी वर्षभराच्या प्राइम मेंबरशिपच्या किमतीत कोणताच बदल करण्यात आलेला नाही, ही ग्राहकांसाठी एका चांगली बातमी आहे. वार्षिक Amazon प्राइम मेंबरशिपची किंमत 1,499 रुपये आहे आणि अधिकृत साइटवर वार्षिक प्राइम लाइट प्लानची ​​किंमत 999 रुपये आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमचे हे आहेत फायदे

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप ज्या लोकांकडे आहे, त्यांच्यासाठी काही फायदे आहेत. Amazon प्राइम मेंबरशिप सदस्यांना ऑनलाईन वस्तू मागवली तर प्राइम शिपिंगसाठी कोणताही वेगळा चार्ज द्यावा लागत नाही. हे सदस्य मुळात पैसे न देता अन्य यूजर्स पेक्षा त्यांना कोणतीही वस्तू तात्काळ आणि जलद वितरण होते. लोकांना प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम डील्स, प्राइम रीडिंग, प्राइम गेमिंग आणि अ‍ॅमेझॉन फॅमिलीचा लाभ घेता येतो.

हेही वाचा :  Used Electric Devices: घरात जुन्या इलेक्ट्रिक वस्तू ठेवल्याने होऊ शकतं नुकसान, आजच करा टाटा-बाय बाय



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …