‘आवाज वाढव डिजे तुला आयची शपथ हाय…’ डीजेने आवाज वाढवला आणि तरुण कायमचा बहिरा झाला

प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : लग्न किंवा एखादी मिरवणूक म्हटलं की डिजे (DJ) वाजवण्याची सध्या फॅशच आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते. स्पीकरपासून अगदी फूटभर अंतरावर मिरवणूकीत अनेकजणं बेधुंद होऊन नाचत असतात. पण थोड्यावेळची मजा आयुष्यभराजी सजा ठरु शकते. ढोल ताशांचा दणदणाट, टोलचा ठोका, ह्दयाचा ठोका चुकविणाऱ्या डिजेच्या गगनभेदी आवाजामुळे कायमचं बहिरेपण येऊ शकतं. अशीच एक घटना पूर्व विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यात घडली आहे. 

काय आहे नेमकी घटना?
भंडारा (Bhandara) जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द इथं राहाणाऱ्या नितीन लिल्हारे या तरुणाला डीजेच्या आवाजाने (DJ Sound) आयुष्यभराची सजा मिळालीय.  नितीनच्या घरात लग्न सोहळा होता. त्याच्या काकांच्या मुलाचं लग्न ठरलं. कुटुंबात लग्न सोहळा म्हटल्यावर उत्साहाचं वातावण होतं. लग्नाची जोरदार तयारी करण्यात आली नवरदेवाची वरात निघाली. लग्नाची वरात म्हटल्यावर नाचगाणं हे आलंच. या वरातीतही मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. कुटुंबियांबरोबर मित्रपरिवारही सहभागी झाला होता. डीजेच्या तालावर सर्वजण थिरकत होते. नितीनही यात सहभागी होऊन बेधुंद नाचत होता.

कानाने आवाज येणं झालं बंद
लग्न सोहळा आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. नितीनही घरी आला,पण त्याला दोन्ही कानाने काहीच ऐकू येत न्हवतं. रात्रभर डीजेचा आवाज त्याच्या कानात गुंजत होता. डीजेच्या आवाजामुळे ऐकू येत नसेल, एक-दोन दिवसात सर्वकाही ठिक होईल असं नितीनला आणि त्याच्या कुटुंबियांना वाटलं. पण एक-दोन नाही तर तब्बल आठ दिवसांनंतरही नितीनला कानाने ऐकू येत नसल्याने अखेर त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी तपासणी केली आणि रिपोर्ट आले. रिपोर्ट पाहून नितीनला धक्काच बसला. नितीनच्या एका कानाला कायमचं बहिरेपण आलं होतं. तर दुसऱ्या कानाने केवळ 15 ते 20 टक्के आवाज येत होता. 

हेही वाचा :  शरद पवारांना अजित पवारांकडून मंत्रीपदाची ऑफर? सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या 'दादाच्या जन्माआधीही...'

मोठ्या आवाजाचा परिणाम
डीजे, स्पिकर, ढोलताशांच्या सानिध्यात बराच वेळ राहिल्यास लहान मुलं, वयस्कर व्यक्ती यांच्या कानावर परिणाम होऊ शकते. गर्भवती महिलांच्या विशेषत: त्यांच्या गर्भातील बाळावर या मोठ्या आवाजाचा परिणाम होऊ शकतो.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डीजेचा आवाज जवळपास 140 डेसिबलहून अधिक असतो. इतक्या मोठा आवाजाने कायमचं बहिरेपणही येऊ शकतं.

डीजेमुळे कोंबड्यंना हार्टअटॅक
डीजेमुळे बहिरेपणा येऊ शकतो हे आपण आजवर ऐकलं असेल. पण डीजेमुळे चक्क आपल्या कोणाचा जीव गेल्याचं ऐकलं आहे का? डीजेच्या आवाजाने कोंबड्या मेल्याचा आरोप एका पोल्ट्रीमालकानं केला. ओडिसातलं हे प्रकरण आहे.  ओडिसातील बालासोरमध्ये एका व्यक्तीनं लग्नादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याबद्दल एका पोल्ट्रीचालकानं तक्रार नोंदवली. डीजेमुळे त्याच्या 63 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

ओडिशात पोल्ट्रीमालकानं दिलेली तक्रार खरी आहे. कोणताही मोठा आवाज माणसांप्रमाणेच पक्षी आणि प्राण्यांवर परिणाम करतो. डीजेचा आवाज हा साधारण आवाजापेक्षा कित्येकपट जास्त असतो. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. कोंबड्यांवर डीजेच्या आवाजाचा परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंधश्रद्धेचा कळस! अपघातात व्यक्तीचा मृत्यू, 20 वर्षांनी नातेवाईकांची रुग्णालयच्या गेटवर पूजा, कारण काय तर..

Superstition : देश 21 व्या शतकात वावरत आहे, पण अजूनही अंधश्रद्धा मूळापासून नष्ट करण्यात आपण …

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …