Jobs in India : ‘या’ उद्योगात नोकऱ्यांचा पाऊस, एक लाख महिलांना मिळणार संधी

Gaming industry : रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी असून या आर्थिक वर्षात देशातील गेमिंग उद्योगात 1 लाख नोकऱ्या निर्माण होतील. एका अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, प्रोग्रामिंग, चाचणी अॅनिमेशन आणि डिझाइनसह सर्व डोमेनसाठी गेमिंग उद्योगात (Gaming industry Jobs) नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असतील. 

 ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन, गेमिंग ॲपचे अनेकांना वेड असते. याचपार्श्वभूमीवर टीमलीज डिजिटल (Teamlease Digital) या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्योगात  (Gaming industry Jobs) 20 ते 30 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत सुमारे 1 लाख नवे रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात महिलांचा 40 टक्के वाटा आहे. भविष्यात अनेक वरिष्ठ पदांवर महिला दिसू शकतात.

भारतात 48 कोटी गेमिंग कम्युनिटी

गेमिंग कम्युनिटीच्या बाबतीत, भारत चीननंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 48 कोटी गेमिंग कम्युनिटी आहेत.  त्यामुळे या क्षेत्रातील मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा जगात सहावा क्रमांक लागतो. जागतिक बाजारातील महसूल सुमारे 17.24 लाख कोटी आहे. अहवालानुसार, या आर्थिक वर्षाच्या शेवटापर्यंत पर्यंत या क्षेत्रात 780 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक अपेक्षित आहे. 

हेही वाचा :  महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जिथे वाहनांना No Entry; किती मोठा श्रीमंत असला तरी पायीच जावं लागतं

या क्षेत्रात संधी वाढणार –

प्रोग्रामिंग : गेम डेव्हलपर्स, युनिटी डेव्हलपर्स
टेस्टिंग : गेम टेस्टिंग इंजिनिअरिंग, गुणवत्ता, क्यूए लीड
ॲनिमेशन डिझाईन : मोशन ग्राफिक डिझायनर, व्हर्च्युअल रिॲलिटी डिझायनर्स
कलाकार : व्हीएफएक्स, कॉन्सेप्ट आर्टिस्ट
इतर रोल्स  : कंटेट लेखक, गेमिंग पत्रकार, रचनाकार 

वाचा : “कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही” 

2026 पर्यंत 2.5 लाख नव्या रोजगारनिर्मिती अपेक्षा

50  हजार सध्या लोकांना गेमिंग उद्योगातून रोजगार मिळत आहे. 
30%  त्यात प्रोग्रामर आणि डेव्हलपर्स आहेत.

भारत दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ 

– 2026 पर्यंत गेमिंग उद्योग 38 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो.
– देशात सध्या सुमारे 48 कोटी गेमर्स आहेत.
– गेमिंग उद्योगाची जागतिक बाजारपेठ सुमारे 17.25 लाख कोटी रुपयांची आहे.
– चालू आर्थिक वर्षात 780 कोटींची परकीय गुंतवणूक या क्षेत्रात शक्य

तीन पटीने वाढणार गेमिंग उद्योग

– भारतातील गेमिंग उद्योग 2027 पर्यंत 3.3 पटीने वाढून सुमारे 8.6 अब्ज डॉलर्स एवढा होऊ शकतो.
– विद्यमान विकास दर 27 टक्के आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘लाव रे तो व्हिडिओ’, उद्धव ठाकरेंची जुनी क्लिप दाखवत बोचरी टीका

Shinde vs Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू …

वसईतील बिबट्या पकडला, मात्र आता भाईंदरमध्ये मोकाट फिरतोय बिबट्या, CCTV Video समोर

Trending News Today: वसई किल्ला परिसरात गेल्या 25 दिवसांपासून धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला मंगळवारी जेरबंद करण्यात …