Twitter Blue Tick : तुम्हाला ब्लू टिक हवेय ! ट्विटरकडून 20 एप्रिल डेडलाईन

Twitter Blue Tick : ट्विटरची व्हेरिफिकेशन ब्लू टिक आता 20 एप्रिलपासून जाणार आहे. एलॉन मस्क यांनीच ही घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. अनपेड अकाऊंट्संचं ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

ब्लू टिक ठेवायची तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. 2009 पासून ट्विटरने ब्लू टिक सुरु केली होती. एलॉन मस्क यांच्याकडे जेव्हा ट्विटरची मालकी आली तेव्हापासून त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील असं जाहीर केले आहे. दरम्यान, ट्विटर (Twitter) व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरने यापूर्वी जवळपास 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केले होते. ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीने 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या यूजर्ससाठी चेकमार्क म्हणजे ब्लू टिक काढून टाकण्याचा इशारा दिला होता. आता सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात येत आहेत. आता ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा :  तुमचे Facebook, Instagram, Twitter हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ? असे राहा सेफ

Twitter Blue : 'ट्विटर ब्ल्यू' आलं भारतात, इतक्या रुपयांच्या बदल्यात मिळणार 'हे' फिचर्स

सेलिब्रिटी व्यक्ती, उद्योग आणि व्यावसायातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, कंपन्या आणि ब्रँड, वृत्तसंस्था आणि सार्वजनिक हिताची अन्य अकाऊंट व्हेरिफाईड आहेत हे ओळखण्यासाठी यूजर्सना मदत करण्यासाठी 2009 मध्ये Twitter ने सर्वप्रथम व्हेरिफाईड अकाऊंट सादर केली. त्यामुळे बनावटआणि खोटी अकाऊंट ओळखणे सोपे झाले होते. दरम्यान, व्हेरिफाईड अकाऊंटसाठी Twitter ने पैसे आकारण्यास सुरुवात केली होती.  परंतु आता ज्यांना ज्यांना अकाऊंटसाठी  Twitter ब्लू टिक हवी आहे, त्यांना आता यापुढे पैसे द्यावे लागणार आहेत.

 ट्विटर ब्लू टीक हे ट्विटरचे सर्वात लोकप्रिय फीचर आहे. आता ही सेवा जगभरात ओळख झाली आहे. ‘ट्विटर ब्ल्यू टिक’ ही सबस्क्रिप्शन सेवा असणार आहे. अँड्रॉइड आणि ios या दोन्हीं प्लॅटफॉर्मवर (Twitter on IOS and Android) 900 रुपये प्रति महिना पैसे भरुन तुमच्या खात्यावर तुम्हाला ब्ल्यू टिक मिळवता येणार आहे. वेबवरील त्याची किंमत फक्त 650 रुपये प्रति महिना असेल तसेच तुम्ही वार्षिक योजना निवडल्यास 566.7 प्रति महिना भरुन ट्विटरची ब्ल्यू टिक सेवा मिळवता येणार आहे.  हे आधीचे दर होते. आता नवे दर काय असतील त्याची माहिती देण्यात आलेली नाही.

हेही वाचा :  भारी इंग्रजीत मेल लिहायचांय? Gmail नं आणलं खास फीचर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमान प्रवास हा पहिलावहिला असो किंवा मग अगदी सराईताप्रमाणं नेहमीच्या नेहमी केला …

देशभर चर्चेत असलेल्या पोर्श कारची किंमत किती? स्पीड, मायलेज सर्वच जाणून घ्या…

Pune Accident News:  पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. पोर्श …