Viral Video : सोशल मीडियावर हा PHOTO तुफान होतोय व्हायरल; काय आहे या महिलांचं सत्य जाणून व्हाल अवाक्

Kerala Unique Ritual Viral Video : या फोटोमधील दिसणाऱ्या सुंदर महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या विषय बनल्या आहेत. पारंपरिक वेशभूषा करुन या महिला एका साऊथ इंडियन मंदिरात कुठल्या तरी उत्सवासाठी एकत्र आल्याचं दिसतं. तु्म्हाला प्रश्न पडला असेल की या महिलांची सोशल मीडियावर का चर्चा होते आहे ते…तर या फोटोमागील सत्य तुम्हाला कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. अगदी आम्ही जे सांगतोय यावरही विश्वास बसणार नाही. चला जाणून घेऊयात काय आहे सत्य…

खरं तर या फोटोमधील पहिली कुरळे केस असलेली महिलेचा फोटो आयआरएएस ऑफिसर अनंत रुपनागुडी यांनी ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. त्यानंतर हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

भारतात काही मंदिरात महिलांना जाण्यास बंदी आहे, तर काही ठिकाणी पुरुषांवर बंदी आहे. पण भारतात एक असही मंदिर आहे, जिथे पुरुषांना महिलांच्या वेशात जाऊन पूजा करावी लागते. 

काय आहे सत्य

हा फोटो केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कोट्टमकुलकारामधील देवीचं एक मंदिर आहे. जिथं चमयाविलक्कू उत्सव (Kottankulangara festival 2023) असतो. त्यातच उत्सवातील हा व्हिडीओ आहे. मल्याळम महिना म्हणजे मीनमच्या दहाव्या आणि अकराव्या दिवशी याचा अर्थ मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात हा उत्सव साजरा केला जातो. ज्या उत्सावाची आगळी वेगळी प्रथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

हेही वाचा :  5 वेळा स्टार्टअप बुडाला; शेवटी अशी उभी केली 9800 कोटींची उलाढाल असलेली कंपनी

ही महिलाच की…

नीट पाहा हा फोटो या महिला ना हो…हे पुरुष आहेत. हो या उत्सवासाठी इथे पुरुष महिलांसारखे तयार होतात. ते महिलांसारखे दागिने साडी ड्रेस मेकअप करुन नटूनथटून मंदिरात येतात. शिवाय या उत्सवासाठी समलैंगिक लोकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.  हा सण म्हणजे तृतिपंथी समुहाचा सर्वात खास असतो. ते या उत्सवासाठी वर्षभर वाट पाहत असतात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. 

विशेष म्हणजे त्यांच्या या श्रृंगारासाठी त्यांना पारितोषिकही दिलं जातं. या उत्सवाला दिव्यांचा आनंदोत्सव असंही म्हणतात. महिलांच्या वेशातील या पुरुषांच्या हातात अनेक दिवे आणि मशाली असतात. मंदिर परिसरात ते एक मिरवणूकही काढतात. विशेष म्हणजे या उत्सवासाठी पुरुष मिशा आणि दाढी देखील काढतात. 

या उत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर लक्ष वेधून घेणाऱ्या या अनोख्या परंपराला पाहून यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत. एक जण म्हणाला की, ‘मी कधीच अंदाज लावू शकतो नसतो.’

आख्यायिका 

असं म्हटलं जातं की, एका मुलांच्या ग्रुपला जंगलात खेळताना एक नारळ मिळालं होतं. तेव्हा त्यांनी तो फोडण्याचा प्रयत्न केला. तो फोड असताना त्यामधून रक्त यायला लागलं. त्यांनी या घटनेबद्दल स्थानिक लोकांना सांगितलं तेव्हा त्यांनी या नारळाला देवीचं रुप मानलं. त्यांनतर या मंदिराची स्थापना झाली. अशी मान्यता आहे की. जे पुरुष महिलांच्या वेशात या मंदिरात पूजा करतात त्यांचा सर्व इच्छा पू्र्ण होतात. या मंदिराची अजून एक खासियत आहे की, इथे कोणत्याही धर्माचे जातीचे लोक येऊ शकता. 

उत्तम नोकरी ते उत्तम बायको

हो या मंदिरात उत्तम नोकरीपासून उत्तम बायकोसाठी पुरुष महिलांच्या वेशात येऊन या मंदिरात पूजा अर्चा करतात. शिवाय या मंदिराच्या गाभाऱ्यावर छत नाही, असं मंदिर असणारं हे केरळमधील एकच मंदिर आहे. 

हेही वाचा :  ऑस्कर्समध्ये भारताचा डंका, सातासमुद्रापार भारतीय पोषाखात राजामौली जपली परंपरा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

आज 96 हजारांच्या जवळपास पोहोचली चांदी; तर, 10 ग्रॅम सोन्याचा दर…; वाचा सोन्या-चांदीचे भाव

Gold Price Today On 29th May: सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. या …

एक फोन आणि…. पुण्यातील ‘त्या’ अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोर

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : (Pune Porsche Accident) पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही …