“मुंबईत राहूनही रोजगार दिला, आता कोण इथे…”, हिंसाचारात शोरुम लुटल्यानंतर बिहारच्या व्यावसायिकाने मांडली व्यथा

BJP Leader Haidar Azam on Bihar Violence: बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफमध्ये झालेल्या हिंसाचारात एक इलेक्ट्रॉनिक शोरुम लुटण्यात आलं. ‘डिजिटल दुनिया’ नावाच्या या दुकानात घुसून तब्बल 3 कोटींचा मुद्देमाल लोकांनी लुटून नेला. शोरुममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. यानंतर शोरुमच्या मालकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित आपली व्यथा मांडली आहे. 

हैदर आजम हे ‘डिजिटल दुनिया’ शोरुमचे मालक आहेत. ते भाजपाचे नेतेही असून सचिव पदावर आहेत. फेसबुकला पोस्ट लिहित ते म्हणाले आहेत की, “बिहार शरीफ (जिल्हा नालंदा) येथे माझ्या डिजिटल दुनिया मॉलमध्ये काही अज्ञात लोकांनी हल्ला करुन सगळा माल लुटून नेला. मुंबईत राहत असतानाही बिहारमधील लोकांना रोजगार देण्याच्या हेतूने मी हा व्यवसाय सुरु केला होता. पण ही घटना पाहिल्यानंतर कोण बिहारमध्ये काम करण्यासाठी येईल?”. 

ही पोस्ट शेअर करताना हैदर आजम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना टॅग केलं आहे.

हेही वाचा :  वॉशरुमसाठी पुरुष चालकांकडून मागावी लागते परवानगी, लाज वाटते.. ट्रेनच्या महिला लोक पायलटने सांगितली आपबीती

‘डिजिटल दुनिया’चे मालक हैदर आझम हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे राज्य सचिव आहेत. तसंच मौलाना आझाद अल्पसंख्याक वित्तीय विकास महामंडळ लिमिटेडचे ते ​​अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना महाराष्ट्रात राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. 

मुंबईत राहणाऱ्या हैदर आझम यांचं बिहारमध्ये डिजिटल दुनिया नावाचं शोरुम आहे. त्यांचा लहान भाऊ जावेद आझम हा व्यवसाय सांभाळतो. भाजपाचे माजी मंत्री मंगल पांडे आणि सैय्य शाहनवाज हुसेन यांनी या शोरुमचं उद्धाटन केलं होतं. त्यांचे संपूर्ण बिहारमध्ये एकूण 8 इलेक्ट्रकॉनिक शोरुम आहेत. 

नालंदामध्ये झालेल्या हिंसाचारात लोकांनी त्यांच्या दुकानातील मोबाइल, लॅपटॉप असं सामान लुटून नेलं.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …