वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करणाऱ्यांना घडणार जन्माची अद्दल; रेल्वेचा मोठा निर्णय

Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सेवेत आल्यापासून तिच्यावर दगडफेक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सतत प्रयत्न होत आहे. त्यातच आता दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) लोकांना वंदे भारत एक्स्प्रेवर दगडफेकीसारख्या समाजविरोधी घटनांमध्ये सहभागी होऊ नका असं आवाहन केलं आहे. अन्यथा दोषींना पाच वर्षांच्या जेलची शिक्षा भोगावी लागेल असा इशारा रेल्वेने दिला आहे. 

तेलंगणात वेगवेगळ्या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Kazipet, Khammam, Kazipet-Bhongir आणि Eluru-Rajahmundry या ठिकाणी सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या 9 घटना घडल्या आहेत. 

‘वंदे भारत’वर दगडफेक केल्यास पाच वर्षांची जेल

फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत सेवेत आल्यापासून तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये तिला टार्गेट करण्यात आलं आहे. 

ट्रेनवर दगडफेक करणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ही शिक्षा 5 वर्षांपर्यंत असू शकते, असं दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल केले असून, 39 जणांना अटक केली आहे. 

हेही वाचा :  बिहारमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजपा नेत्याचा मृत्यू

स्थानकांवरील सुरक्षेत वाढ

दगडफेकीच्या घटना कमी करण्याच्या हेतूने रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असून यासाठी काही मोहीमा आखण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे ट्रॅकजवळील सरपंचांशी संवाद साधत असून त्यांना मित्र केलं जात आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेन्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच दगडफेक होणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

तब्बल 8 वेळा मत देणाऱ्या व्यक्तीवर अटकेची कारवाई; कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

देशभरात लोकसभा निवडणुकांची लगबग पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. 18 …

गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वरजवळ विकत घेतलं संपूर्ण गाव, 620 एकर जमीनखरेदीचा दावा

Entire Village In Satara Purched By Gujarat GST Commissioner: गुजरातमधील जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातील एक संपूर्ण …