Corona In India: सावधान! देशात वेगाने वाढतोय कोरोना, ‘या’ राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद

Corona Virus Updates: कोरोना महामारीने देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात गेल्या 24 तासात 1805 नवे कोरोना रुग्णसंख्या आढळलीय. तर जगभरात गेल्या 7 दिवसात तब्बल 6.57 लाखाहून अधिक नवी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. या सात दिवसात 4,338 जणांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे भारतातही कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधले तीन जणं ही उत्तर भारतातील आहेत. (Four people died due to corona in India)

देशातील गेल्या काही दिवसातील स्थिती
देशात गेल्या काही दिवसात दररोज हजाराहून अधिक रुग्ण आढळत असून सक्रिय रुग्णसंख्या (Active Cases) दहा हजारांच्या पार गेली आहे. 
27 मार्च – 10300  
26 मार्च – 9433  
25 मार्च – 8601 

कोणत्या राज्यात किती रुग्ण
 
केरळ –  2471 रुग्ण

महाराष्ट्र – 2117 रुग्ण

गुजरात – 1697 रुग्ण 

कर्नाटक – 792 रुग्ण 

तमिलनाडू – 608 रुग्ण

दिल्ली – 528 रुग्ण  

गेल्या चोवीस तासात ज्या राज्यात मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यावरुन एक स्पष्ट होतंय ते म्हणजे दक्षिण आणि मध्य भारतानंतर आता उत्तर भारतात (North India) कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात ज्या चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, त्यात उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), चंदीगड (Chandigarh), हिमाचल (Himachal) आणि गुजरातमध्ये (Gujrat) प्रत्येकी रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या तीन वर्षातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर जगभरात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत (America) आतापर्यंत 106,102,029 रुग्णांची नोंद झाली आहे. तर भारतात आतापर्यंत 44,705,952 रुग्ण सापडले. 

हेही वाचा :  आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल

गेल्या काही दिवसात आढळणाऱ्या दैनंदिन रुग्णांची आकडेवारी पाहिली तर भारत सातव्या क्रमांकावर आहे. 

रशिया – 10,940 रुग्ण

दक्षिण कोरिया – 9,361 रुग्ण

जपान- 6,324 रुग्ण

फ्रांस- 6,211 रुग्ण 

चिली-2,446  रुग्ण

ऑस्ट्रिया- 1,861 रुग्ण

भारत- 1,805 रुग्ण

चीनने अद्याप कोरोना रुग्णांचा विश्वसनीय डाटा शेअर केलेला नाही. पण WHO ने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 9.9 कोटीहून अधिक आहे. तर 120,775 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये गेल्या सात दिवसात 54,449 रुग्ण सापडले आहेत. तर जगभरात गेल्या सात दिवसात  6.57 लाख प्रकरणं आढळून आली आहेत. जगभरात गेल्या सात दिवसात 4,338 लोकांचा मृत्यू झाल आहे. समाधानाची बाब म्हणजे रिकव्हरी रेट 98.8 वर पोहोचला आहे. 

देशात सतर्कतेचा आदेश
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख राजीव बहल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व रुग्णालयांना 10 आणि 11 एप्रिलला मॉक ड्रिल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्स, औषधं, ऑक्सिजन आणि वेंटीलेटर्सची तपासणी करण्यासही सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  Covid 19: महाराष्ट्रातील करोनाची स्थिती चिंताजनक, तज्ज्ञांनी दिला इशारा; म्हणाले "जर..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

एकमेकांच्या अंगावर घातल्या कार..तलवारबाजी आणि बरंच काही..भर रस्त्यात गॅंगवॉर

Karnatak Gangwar Video: आधी पांढरी कार मागच्या बाजुने काळ्या कारला ठोकते..त्यानंतर काळ्या कारमधून 3 तरुण …

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …