जन्मापूर्वीच बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली असेल तर ठरते का धोकादायक

अ‍ॅम्बिकल कॉर्ड ही आई आणि बाळाला एकत्र जोडते. आई जे खाते ते सर्व बाळाला यात नाळेतून पोहचते. याच नाळेमुळे बाळाचा विकास गर्भात होणे शक्य होते. या नाळेतून रक्तपुरवठा, ऑक्सिजन, पोषक तत्व, विटामिन, फॅट्स आणि प्रोटीन सगळ्या गोष्टी बाळाला मिळत असतात. न्युकल कॉर्ड अथवा अ‍ॅम्बिकल कॉर्डचे खूपच महत्त्व आहे.

मात्र प्रेग्नन्सीदरम्यान अ‍ॅम्बिकल कॉर्ड बाळाच्या गळ्याभोवती आवळली गेली अथवा गुंतली तर काय होते? असे बऱ्याच बाळांच्या बाबतीत घडते. बाळ पोटात फिरत असताना ही नाळ त्यांच्याभोवती गुंतली जाते आणि मग बाळाचा जन्म होताना गुंतागुंत होऊ शकते. जाणून घ्या अधिक माहिती. (फोटो सौजन्य – iStock)

न्यूकल कॉर्ड अथवा अ‍ॅम्बिकल कॉर्ड म्हणजे काय?

न्यूकल कॉर्ड अथवा अ‍ॅम्बिकल कॉर्ड म्हणजे काय?

Webmd नुसार, तुमच्या बाळाच्या गळ्याभोवती एक किंवा अधिक वेळा गुंडाळली गेली असेल तर त्याला न्यूकल कॉर्ड असे म्हटले जाते. ही सैलसर अथवा घट्टही असू शकतो. न्यूकल कॉर्ड्स A आणि B अशा प्रकारात वैद्यकीय भाषेत सांगण्यात आली आहे.

हेही वाचा :  New Zealand vs Pakistan : गड आला पण सिंह गेला, केन विल्यमसनने अचानक का सोडलं मैदान? समोर आलं कारण!

न्यूकल कॉर्ड्सचे प्रकार

न्यूकल कॉर्ड्सचे प्रकार

टाईप ए न्यूकल कॉर्ड अर्थात याला अनलॉक्ड कॉर्ड असेही म्हटले जाते. ही फ्री मुव्हींग असून गर्भातच आपल्या आपण नीट होते. तर टाईप बी न्यूकल कॉर्डस ज्याला लॉक कॉर्ड्स असे म्हणतात ती गर्भात मुलाच्या गळ्याभोवती गुंडाळली जाते आणि बाळाला यामुळे सीझेरियन पद्धतीनेच बाहेर काढावे लागते.

(वाचा – प्रेग्नन्सीमध्ये ब्लिडिंग का होते? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास, गर्भपाताचा होऊ शकतो त्रास)

न्यूकल कॉर्ड होण्याचे कारण

न्यूकल कॉर्ड होण्याचे कारण

Healthline ने दिल्यानुसार, तुम्ही जर गरोदर असाल आणि तुमच्या बाळाची गर्भात अधिक हालचाल होत असेल हे तुम्हाला जाणवेल. हेल्दी कॉर्ड जेलेटिनस, सॉफ्ट फिलिंगने भरलेली अशते ज्याला वॉटर्न जेली म्हणतात. ही जेली कॉर्ड गुंतू देत नाही. काही कॉर्ड्समध्ये जेली पूर्णतः पोचत नाही आणि त्यामुळे न्यूकल कॉर्ड तयार होते.

(वाचा – ६ महिन्यात दोन वेळा जुळ्या मुलांना जन्म, मोमो ट्विन्स म्हणजे नेमके काय)

कधी तयार होते न्यूकल कॉर्ड

कधी तयार होते न्यूकल कॉर्ड
  • तुमच्या गर्भात जुळी मुलं अथवा अधिक मुलं असल्यास
  • तुमच्या शरीरात अत्याधिक एम्नियोटिक फ्लुईड असल्यास
  • कॉर्ड अधिक लांब असल्यास
  • नाळेची संरचना खराब असल्यास
  • बाळ वजनाने जास्त असल्यास अथवा गर्भात अधिक फिरत असल्यास
हेही वाचा :  संक्रांतीसाठी काळ्या नेट साडीवर ट्रेंडी डिझाईन्सचे ब्लाऊज दिसतील क्लासी, हटणार नाही तुमच्यावरून नजर

न्यूकल कॉर्डचे लक्षण

न्यूकल कॉर्डचे लक्षण

न्यूकल कॉर्डचे काहीही लक्षण नाही. तसंच तुमच्या गर्भावस्थेच्या लक्षणांमध्ये कोणताही बदल गरोदर महिलांना जाणवत नाही. एका आईसाठी मुलांची न्यूकल कॉर्ड आहे की नाही हे सांगणे अजिबात शक्य नाही.

(वाचा – या अभिनेत्रीने ५६ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, गरोदर राहिल्याने डॉक्टरही झाले अवाक्)

काय होते गुंतागुंत?

काय होते गुंतागुंत?

Nuchal Cord ने निर्माण होणारी गुंतागुंत ही दुर्मिळ आहे. तणावात यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते. याबाबतीत आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत गरजेची आहे. साधारणतः गुंतागुंतीच्या प्रसूतीदरम्यान ही अवस्था निर्माण होते. नाळ अधिक गुंतलेली असेल तर बाळाला रक्तपुरवठा कमी होते आणि बाळाच्या हृदयाची गतीही कमी होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांना बाळाला मॉनिटर करावे लागते.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

‘उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाने माविआचा प्रयोग फसला’, शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar Statement : 2004 मध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद का नाकारलं? याबाबत शरद पवारांनी एका मुलाखतीत …