मलायकाने ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये तापवलं इंटरनेटचं वातावरण

मलायका अरोरा आणि तिचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलायका आपल्या फॅशनने सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसते. आता तर तिने एका सोहळ्यात आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह उपस्थिती लावली आणि कपड्यांमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

मलायकाला १८ वर्षांचा मुलगा आहे असं तिच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही. मलायका आपल्या लुकने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत असते. पुन्हा एकदा बॅकलेस ब्लॅक गाऊन ड्रेस घालून मलायकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्याशिवाय कोणाचेच नाव ओठावर येणार नाही असा लुक केला आहे. (फोटो सौजन्य – @malaikaaroraofficial Instagram)

बॅकलेस ब्लॅक गाऊनचा जलवा

बॅकलेस ब्लॅक गाऊनचा जलवा

मलायकाने आपली परफेक्ट फिगर बॅकलेस ब्लॅक ड्रेसमध्ये फ्लाँट केली आहे. मलायकाच्या या लुकमुळे सध्या इंटरनेटचे वातावरण तापलेले दिसून येत आहे. सगळीकडे मलायकाच्या याच बॅकलेस ड्रेसची चर्चा आहे. मलायकाने घातलेला हा ड्रेस @monotofficial ची असून नक्कीच याची किंमत तोंडात बोटं घालायला लावणारी असेल.

कमरेवर दोन्ही बाजूने कट

कमरेवर दोन्ही बाजूने कट

मलायकाने पुरस्कार सोहळ्यासाठी निवडलेल्या या बॅकलेस गाऊनला कमरेच्या दोन्ही बाजूला कट ठेवण्यात आला होता. तर खाली हा गाऊन पायघोळ दिसून आला. मलायका या लुकमध्ये अत्यंत स्टनिंग, आकर्षक आणि अधिक तरूण दिसत आहे. कोणीही तिला ४८ वर्षांची म्हणणार नाही.

हेही वाचा :  ठाणे ते बोरिवली हे अंतर 10 मिनिटांत पार होणार; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला जबरदस्त प्लान

(वाचा – ‘कल्याणची चुलबुली’ शिवालीचा बेधडक मॉडर्न पैठणी ड्रेस लुक, पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मेळ )

कोहल न्यूड मेकअप

कोहल न्यूड मेकअप

मलायकाने यासह कोहल काजळ, स्मोकी आईज आणि न्यूड मेकअप केला आहे. काळ्या ड्रेससह हा मेकअफ परफेक्ट मॅच होतोय. तर लिपस्टिकसाठी तिने न्यूड लिपस्टिक निवडली असून नॅचरल बेस लावला आहे. ज्यामुळे तिचा चेहरा अधिक उजळून आलाय. तिच्या स्किनटोनशी मॅच असणाऱ्या मेकअपमुळे कुठेही अतिरंजित मेकअप दिसून येत नाहीये.

(वाचा – ग्लॅमरस ड्रेसवर पायात पैंजण, अनुष्काच्या फॅशनवर इंप्रेस झालेत चाहते)

पोनीटेल

पोनीटेल

या ब्लॅक ड्रेससह सिल्व्हर पट्ट्याचा उपयोग करत तिने पोनीटेल बांधली आहे. पार्टी अथवा कोणत्याही पुरस्कार सोहळ्यासाठी ही स्टाईल परफेक्ट ठरतेय. मलायका तिचा प्रत्येक लुक उत्कृष्ट कॅरी करते. तिचा हा रॅव्हिशिंग लुकदेखील तितकाच सुंदर दिसतोय.

(वाचा – निळ्याशार कपड्यातील करिश्माने वेधले लक्ष, चेहऱ्यावरील ग्लो समोर तरूण अभिनेत्रीही फिक्या )

केवळ अंगठीचा केला उपयोग

केवळ अंगठीचा केला उपयोग

हा ड्रेस गळांबद असून मागून पूर्ण ओपन आहे. त्यामुळे मलायकाने यासह कोणतेही दागिने घातलेले नाहीत. मात्र हातात पाचूची अंगठी घालून तिने स्टायलिश दिसण्याची कोणताही संधी सोडलेली नाही. पाचूची सिल्व्हर अंगठीही लक्ष वेधून घेत आहे.
मलायकाचा हा लुक सध्या चर्चेचा विषय ठरला असून आतापर्यंतच्या तिच्या स्टाईलवर तिनेच वेगळ्या लुकने मात केलेली दिसत आहे. तर सध्याच्या तरूण अभिनेत्रींनाही लाजवेल असा तिचा हा लुक पुन्हा पुन्हा पाहात राहावासा आहे.

हेही वाचा :  जोधा अकबरच्या ऐश्वर्यापासून कियारा अडवाणीपर्यंत, या वेडिंग सीझनला ग्लॅमरस लूकसाठी आयडियल ठरतील हे ५ लूक



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Updates: विदर्भाला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका; मुंबईत कशी असणार हवामानाची स्थिती?

Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागतोय. महाराष्ट्रात गेल्या काही …

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …