जेलमध्ये बंद नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीला गंभीर आजार; पत्र लिहित म्हणाल्या “माफ करा, मी तुमची वाट पाहू शकत नाही”

Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानंतर जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांची सुटका व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू (Navjot Kaur Sidhu) वारंवार प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश मिळत नाही आहे. यादरम्यान आता त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्र लिहून आपल्याला गंभीर आजार झाल्याचा खुलासा केला आहे. आपल्याला स्टेज २ कॅन्सर (Stage 2 Cancer) झाल्याचं त्यांनी पत्रातून सांगितलं आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी ट्वीटही केलं आहे. 

नवज्योत सिंग सिद्धू सध्या पटियाला सेंट्रल जेलमध्ये (Patiala central prison) बंद आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नवज्योत कौर यांनी पतीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की “तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असून, त्यासाठी तुम्हाला जेलमध्ये बंद करण्यात आलं आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना तुम्ही माफ करा. जेलच्या बाहेर रोज तुमची वाट पाहणं यामुळे मला प्रचंड वेदना होत असतात. नेहमीप्रमाणे दु:ख वाटून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मला माहिती आहे की, ही खूप वाईट वेळ आहे. पण आता यात बदल होताना दिसत आहे”.

हेही वाचा :  लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांना अटक करण्यात आलेली असून ते सध्या पटियाला जेलमध्ये बंद आहेत. रस्त्यावरील एका भांडणातील प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. 

नवज्योत कौर यांनी ट्वीट करत आपल्याला स्टेज 2 कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं आहे. “आपल्याला स्टेज 2 कॅन्सर असून यासाठी आपण कोणालाही दोष देऊ इच्छित नाही. हीच देवाची मर्जी आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे. 

नवज्योत कौर यांनी पत्रातही याचा उल्लेख केला आहे. “न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून, तो मिळण्यास वेळ लागत आहे. मी नेहमी तुमची वाट पाहत असते. सत्यामध्ये ताकद असते आणि ते दरवेळी तुमची परीक्षा घेत असतं. पण मला माफ करा, मी तुमची वाट पाहू शकत नाही. कारण मला स्टेज 2 कॅन्सर आहे. आज माझी सर्जरी होणार असून, मी यासाठी कोणालाही देष देऊ इच्छित नाही. हीच देवाची मर्जी आहे,” असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. 

२७ डिसेंबर १९८८ ला पार्किंगवरून सिद्धू यांचा एका ज्येष्ठ नागरिकासह वाद झाला होता. सिद्धूंनी त्या नागरिकाला मारहाण केली आणि फरार झाले, असा आरोप होता. पीडित नागरिकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं असता मृत घेषित करण्यात आल होतं. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि सुप्रीम कोर्टाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. 2018 मध्ये एक हजाराच्या जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली होती. 

हेही वाचा :  "मोदींच्या तुलनेचा नेता...", संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका; म्हणाले, "काँग्रेसनं पंजाब कायमचा गमावला"! | sanjay raut slams bjp pm narendra modi on five states election results



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..’; ‘मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले’

Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानांवरुन उद्धव ठाकरे …

‘..याचा अर्थ स्वयंप्रभू मोदी व त्यांचे भक्त देवेंद्र ‘मुजरा’ करीत होते’; ठाकरे गट म्हणाला, ‘4 जूननंतर..’

PM Modi Election Campaign Comments: “निवडणुका संपताच नरेंद्र मोदी यांच्यावर उपचार करून घेणे गरजेचे आहे,” …