Today Gold Silver Price : नवरात्रीच्या दिवसात स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या एका क्लिकवर आज किती स्वस्त झाले सोने?

Gold Silver Rate on 23 March 2023: चैत्र नवरात्रींच्या दिवसात सोने-चांदी (Gold and silver Price) खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. गुरूवारी सोने-चांदीच्या दरातच नरमाई दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 574 रुपयांनी घसरला. तर सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,614 रुपयांच्या वर आहे. तर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Rate) दरात घसरण झाली असून 22 कॅरेट सोने (22 के सोने) आज 55,130 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जाणार आहे. तर 24 कॅरेट सोने 57,890 रुपये प्रति 10 ग्रॅमने विकले जाईल. म्हणजेच एकंदरीत आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 

22 मार्च रोजी सोन्याचा भाव 58,614 रुपये आहे. संध्याकाळी सोन्याचा भाव 59,188 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्यामध्ये घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 474 रुपयांनी घसरून 53,690 रुपयांवर आहे. तुम्हीही सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजचे 22 कॅरेट सोने 55,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने 58,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. म्हणजेच काल जी चांदी 74,700 रुपये प्रति किलोने विकली जात होती. ती आज 74,000 रुपये किलोने विकली जाईल. म्हणजेच एकूणच चांदीच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :  दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याने गाठला 7 महिन्यांचा निच्चांक, चांदीचाही भाव उतरला

वाचा: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? झटपट चेक करा आजचे दर

22 आणि 24 कॅरेट सोन्यामध्ये फरक

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध असले तरी ते अतिशय लवचिक आणि कमकुवत आहे. या कारणास्तव त्यापासून दागिने बनवता येत नाहीत.  

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. 

हेही वाचा :  उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले; 22, 18 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर जाणून घ्या



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: ‘अजित पवारांचा फोन जप्त करा आणि..’, पुण्याच्या पालकमंत्र्यांना 5 प्रश्न विचारत आरोप

Pune Porsche Accident Allegations Against Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार …

Mahavitaran Job: बारावी उत्तीर्ण आहात? महावितरणच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: बारावी उत्तीर्ण असून नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र …