‘ही आमची जमीन आहे, तुला कन्नड बोलावं लागेल’ हिंदी बोलणाऱ्या मुलीला ऑटो ड्रायव्हरने खाली उतरवलं… Video व्हायरल

Auto Driver Video Viral: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंडे वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दक्षिण भारतातला (South India) असल्याचं बोललं जात आहे. तिथल्या मातृभाषेत (Mother Tongue) न बोलल्याने एक ऑटो चालक (Auto Driver) इतका संतापला की त्याने रस्त्यात मध्येच महिला प्रवाशाला (Female Passenger) ऑटोतून खाली उतरवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video on Social Media) झाला असून यात ऑटो ड्रायव्हर त्या महिला प्रवाशाबरोबर मातृभाषेवरुन वाद घालताना दिसत आहे. 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत महिला प्रवाशाने हिंदीत संवाद (Hindi Language) साधल्याने ऑटो चालक संतापल्याचं दिसत आहे. तो इतका संतापलाय की त्याने त्याच्या भाषेत महिला प्रवाशाला शिवीगाळही केली. व्हिडिओत ऑटो चालक महिला प्रवाशाबरोबर वाद घालतोय. यात तो महिलेला सांगतोय ही आमची जमीन आहे, तुमची नाही, इथं तुम्हाला कन्नड भाषेतच (Kannad Language) बोलावं लागेल. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

ऑटो ड्रायव्हर त्या महिला प्रवाशाला कन्नड भाषेत बोलण्याची जबरदस्ती करताना दिसत आहे. आपल्याला कन्नड भाषा येत नसल्याचं ती महिला प्रवासी ऑटो चालकाला सांगतेय, पण तो ऑटो चालक ऐकण्याच्या मनस्थिती दिसत नाही. महिलेच्या विनवणीनंतरही तो चालक संतापलेला दिसत आहे. कन्नड बोलता येत नसल्याने त्या ऑटो चालकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच ऑटोमधून खाली उतरवलं. यानंतर ही महिला प्रवासी ऑटोतून खाली उतरली.

हा व्हिडिओ Anonymous ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. यात कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. ‘उत्तर भारतीय भिकारी, ही आमची जमीन’ असे शब्द ऑटो चालकाने वापरले आहेत. कर्नाटकचे असल्याचं गर्व करणं आणि कन्नड भाषेत बोलण्यास जबरदस्ती करणं हे दोन वेगळे प्रकार असल्याचंही या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. 

हेही वाचा :  पुण्यात मच्छरांचं वादळ; आकाशापर्यंत उंच उडणाऱ्या रांगा पाहून पुणेकर धास्तावले, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडिओ कधीचा आणि नक्की कोणत्या ठिकाणचा आहे याचा दावा करण्यात आलेला नाही. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसऱ्या राज्यातून आलेल्या लोकांबरोबर असा व्यवहार करणं चुकीचं असल्याचं काही युजर्सने म्हटलं आहे. तर काही युजर्सने अतिथी देव भव असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …