Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर

Earthquake Effects in Delhi-NCR Video : अफगाणिस्तानमध्ये आलेल्या तीव्र भूकंपाचे धक्के उत्तर भारताताही दिसून आले. दिल्ली एनसीआरमध्ये अचानक रात्रीच्या वेळी भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच भीतीदायक वातावरण निर्माण झालं. सगळेकडे धावपळ…रात्री 10 वाजता आलेल्या या भूकंपानंतर लोक घराबाहेर पडली. धक्कादायक म्हणजे भूकंपानंतर दिल्लीतील अनेक इमारती झुकल्याचा अहवाल दिल्ली अग्निशमन दलाने दिला आहे. (delhi ncr earthquake 2023 Effects people rush out of houses Shocking video viral on Social media )

अंगावर शहारे आणणारे व्हिडीओ समोर 

पाकिस्तानमध्ये जाणवलेल्या 6.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे दिल्लीसह अनेक भारतीय शहरांतील नागरिकांनाही घाबरुन सोडलं. 

अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात केंद्रबिंदू असलेल्या या ठिकाणी भूकंप दोन मिनिटांपर्यंत होता. भूकंपाचे केंद्र पाकिस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या अफगाणिस्तानच्या जुर्म शहरापासून 40 किलोमीटर दक्षिण-पूर्वेला होते. 

 भूकंपाच्या वेळी छताचे पंखे आणि लाईट फिक्स्चर हलतानाचे व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. काश्मीर आणि जयपूरसारख्या राज्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

राजधानीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आणि लोक रस्त्यावर पळत सुटली. दिल्ली विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याने उत्तर कॅम्पसमधील त्यांच्या वसतिगृहाबाहेर अनेक विद्यार्थी दिसतं आहेत. 

भूकंपाचे झटके जाणवल्यानंतर मोठ्या मोठ्या इमारतीतून रहिवाशी पायऱ्यांनी खाली उतर मोकळ्या मैदानात तर कुठे बागे आसरा घेताना दिसले. 

भूकंपानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि ते घर सोडून बाहेर पडले. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 मोजण्यात आली. त्याचा केंद्रबिंदू उत्तर अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 133 किमी आग्नेयेला होता.

या भूकंपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक ठिकाणी भिंती तडे गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणंय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरीक घरातून बाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात आले.  



Source link

हेही वाचा :  बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …