24 वर्षीय शिंवागीला गंभीर किडनी इनफेक्शन,दिसली भयंकर 8 लक्षणं,किडनी वाचण्यासाठी केला हा उपाय

Infection in Kidney : हायड्रेटेड राहणे म्हणजे शरीराला आवश्यक आहे तितके पाणी रोज न चुकता पिणे होय. जेणेकरून शरीर उत्तम प्रकारे कार्य करू शकते. जर शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे Kidney Infection, Kidney Stone आणि किडनीच्या इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. हीच गोष्ट घडली टीव्ही अभिनेत्री Shivangi Joshi सोबत आणि नुकतेच तिने किडनीच्या आजारावर उपचार घेतले आहेत. आता त्या आजारातून बरी झाल्यावर त्याने आपल्या चाहत्यांना सल्ला दिला आहे की, तुम्ही तुमच्या शरीराची, मनाची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी पित राहून हायड्रेटेड राहा.

जर तुम्ही शिवांगी जोशीला ओळखत नसाल तर मंडळी, ती एक प्रसिद्ध छोट्या पडद्यावरची अभिनेत्री आहे आणि तिने प्रसिद्ध टीव्ही शो ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मध्ये काम केले आहे. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त असून तिने तिच्या अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबत तिने नारळ पाणी पितानाचा फोटो शेअर करत आपल्या आजारपणाबद्दल सांगितले आणि हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला दिला. (फोटो सौजन्य :- shivangijoshi18 इंस्टाग्राम, iStock))

हेही वाचा :  मला वाचवा! माझी पत्नी माझे सर्व पैसे खर्च करतेय, ही बाई मला कंगाल करूनच सोडेल

शिवांगी जोशीला किडनी इनफेक्शन

हायड्रेट राहणे आणि किडनी इन्फेक्शन

हायड्रेट राहणे आणि किडनी इन्फेक्शन

शिवांगीच्या पोस्टवरून एक गोष्ट समजली की आता संपूर्ण भारतात उष्णता झपाट्याने वाढत आहे आणि या काळात हायड्रेटेड न होण्याचा सर्वात मोठा धोका आहे. अनेकदा या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये किडनीच्या संसर्गाची प्रकरणेही वाढतात. उन्हाळ्यात जास्त घाम आल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.
(वाचा :- Weight Loss Cancer या पद्धतीने वेटलॉस करणं खूप लाभदायक व सुरक्षित, नाहीतर ब्लड सेल्समध्ये कॅन्सर बनवतो लठ्ठपणा)​

किडनी इन्फेक्शन का होते?

किडनी इन्फेक्शन का होते?

मूत्रमार्गात ई कोलाई (E.Coli) मुळे बॅक्टेरियल इनफेक्शन झाल्यास किडनी इन्फेक्शन होते. बॅक्टेरिया मूत्रमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात आणि किडनीत पोहोचतात आणि संसर्गास कारणीभूत ठरतात.

(वाचा :- 95% ब्लॉकेजेसमुळे आला हार्ट अटॅक, सुष्मिता सेनच्या Cardiologist चे हे 5 उपाय नैसर्गिकरित्या टाळतात जीवाचा धोका)​

किडनी इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत?

किडनी इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत?
  1. जेव्हा किडनीमध्ये इन्फेक्शन होते तेव्हा तेव्हा पाठीच्या खालच्या भागात आणि ओटीपोटात अर्थात पोटाच्या खालील भागात वेदना होतात
  2. शिवाय जननेंद्रियांभोवती वेदना आणि अस्वस्थता जाणवू लागते
  3. खूप ताप येऊ शकतो
  4. तापासोबत अंग थरथरते आणि थंडी वाजू शकते
  5. अत्यंत अशक्तपणा जाणवतो
  6. भूक लागत नाही
  7. आळस येतो
  8. काही प्रकरणांमध्ये, पिडीत व्यक्तीला जुलाब देखील होऊ शकतात
हेही वाचा :  Nitin Gadkari: ''पंधरा वर्षे जूनी वाहनं...''; केंद्रीय मंत्री गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय

(वाचा :- Anti Aging: वयाच्या 60 नंतरही येणार नाही म्हातारपण, कायम दिसाल अनिल कपूरसारखे तरूण-फिट, खायला घ्या हे 5 पदार्थ)​

हायड्रेटेड राहणे गरजेचे का आहे?

हायड्रेटेड राहणे गरजेचे का आहे?

किडनीच्या इनफेक्शनने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेकदा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो कारण यामुळे किडनीतून बॅक्टेरिया बाहेर काढण्यास मदत होते. गडद रंगाची लघवी आणि दुर्गंधीयुक्त लघवी थांबत नाही तोपर्यंत पाणी पीत राहावे असा सल्ला डॉक्टर देतात.
(वाचा :- Anti Cancer Vegetables: कॅन्सरच्या कट्टर दुश्मन आहेत या 10 भाज्या, कॅन्सर पेशींचा जन्म घेण्याआधीच करतात खात्मा)​

डिहायड्रेशनचा धोका

डिहायड्रेशनचा धोका

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार, डिहायड्रेशन म्हणजेच कमी पाणी पिणे किंवा न पिणे यामुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (यूटीआय) होण्याचा धोका असतो. एवढेच नाही तर पुरेसे पाणी न पिल्याने किडनीचे आजार आणि किडनी निकामी होण्याचा धोकाही असतो. लघवी करताना दुखणे किंवा जळजळ होणे, वारंवार लघवी होणे, लघवी करूनही आराम न लागणे, लघवीतून रक्त येणे, लघवीला दुर्गंधी येणे आणि पोटाच्या खालच्या भागात सतत दुखणे हे डिहायड्रेशनमुळे होणारे त्रास आहेत.
(वाचा :- Weight Loss Diet : ‘हे’ 4 उपाय नऊ रात्रींमध्ये जाळतील पोट, मांड्या व कंबरेवरची एकूण एक चरबी, पाठ-पोट होईल सपाट)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

हेही वाचा :  अतिसार, पोटात दुखणे, जळजळ ही गॅसची नाही तर असू शकतात पोटाच्या colon cancer ची लक्षणे



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …