ED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे

ED raids in Chhatrapati Sambhajinagar :  पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात आज संभाजीनगरात 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील 3 ठिकणी छापेमारी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे. 

संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आल आहे, त्यामुळं महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक – भागीदारांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. 

या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तक्रार केल्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. आकाशवाणी परिसर येथे कंत्राटदार संबंधित या क्लिनिकवर  ईडीचे लोक आले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. 

हेही वाचा :  ED Raids Pune : पुण्यात ईडीची छापेमारी, काही बिल्डर्स - कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Politics : ‘सर्वात मोठा घोटाळा, नियम ‘कात्रज’च्या धाब्यावर…’, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ambulance Scam : राज्याच्या आरोग्य विभागात साडेसहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झाल्याचा …

औरंगजेबाने तोडलेली मंदिर पुन्हा बांधण्यापासून महिलांची सेना बनवण्यापर्यंत..’, महाराणी अहिल्याबाईंची प्रेरणादायी कहाणी

Ahilyabai Holkar jayanti 2024: 31 मे रोजी  महाराणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी केली जाते. …