ED Raids Pune : पुण्यात ईडीची छापेमारी, काही बिल्डर्स – कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी

ED Raids Pune : छत्रपती संभाजीनगर येथे छापेमारी केल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही छापेमारी केली आहे. (ED Raids)  छत्रपती संभाजीनगरमधील धागेदोरे हे पुण्याशी असल्याचे या छापेमारीवरुन स्पष्ट झाले आहे. पुण्यात काही बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरसवर ईडीने छापे मारले आहेत. दरम्यान, अधिक माहिती हाती आलेली नाही. ( ED raids in Pune

 केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याचे माहिती पुढे आल्यानंतर संभाजीनगरमध्ये छापेमारी करण्यात आली. आज सकाळपासून ईडीने छापमारी सुरु केलीय. सकाळच्या विमानाने जवळपास 15 लोकांचे पथक संभाजीनगरात दाखल झाले. त्यानंतर ही छापेमारी सुरु झाली आहे. पुण्यातही छापेमारी करण्यात आल्याने  बिल्डर्स – कॉन्ट्रॅक्टरचे धाबे दणाणले आहेत. 

ED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे

पंतप्रधान आवास योजनेत समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची 128 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. 

हेही वाचा :  डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची साक्षीदाराकडून ओळख

दरम्यान, संभाजीनगर शहरात गोरगरिबांसाठी 40  हजार घरे बांधताना महापालिकेने सुमारे साडे चार हजार कोटी रुपयांच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर कृपा दाखवली होती असा आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुमारे साडे चार हजार कोटी रुपये  खर्चून सात ठिकाणी तब्बल 39 हजार 760 सदनिका बांधण्यात येणार  होत्या. मात्र या कामाचे सर्व नियम आणि धोरणे पायदळी तुडवून पालिकेने नव्याने निविदा पक्रिया न राबवता केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी केल्याची आणि त्यात मोठा घोटाळा झाल्याचीबाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री , गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशी केली, त्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.  याबाबत ईडी कडे तक्रार दिल्यानंतर  ईडीने  या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती. 

तर दुसरीकडे  पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला होता. याची तक्रार महापालिकेने पोलिसात दिली होती. एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आल होते,  त्यामुळं महापालिकेच्या  यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक- भागीदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. त्याची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा :  पुणेकरांसाठी Good News! जिल्ह्यात लवकरच तिसरी महानगरपालिका; अशी असेल रचनाSource link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Fathers Day 2024 : घरापासून लांब राहणारा मुलगाच समजू शकतो ही भावना; बाबा तुला कडक सॅल्यूट!

Happy Fathers Day 2024 : कोणत्याही भावनेत न बांधता येणारं, कोणत्याही शब्दांमध्ये व्यक्त न होणारं …

Quiz: असं कोणतं फळ आहे जे विमान प्रवासात घेऊन जाऊ शकत नाही?

GK Questions And Answer : फळं आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाच्या असतात. म्हणूनच हिरव्या …