Trending News : पिवळ्या लेहेंग्यातील ‘त्या’ महाराष्ट्रीय तरुणीचा फोटो व्हायरल, रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स

Viral Photo : सोशल मीडियावर एका क्षणात तुम्ही प्रसिद्ध होतात. एखादी घटना असो किंवा एखादा फोटो तो काही सेकंदात या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो. असे अनेक लोक आहेत जे एका रात्रीत सोशल मीडिया स्टार झाले. सध्या एका तरुणीच्या फोटोने सोशल मीडियावर (social media viral news) आग लावली आहे. (wearing yellow lehenga)

पिवळा लेहेंगा घातलेली सुंदर तरुणी (Yellow lehenga girl) या फोटोमध्ये दिसतं आहे. पाठमोरा हा तरुणीचा फोटो अनेकांचं (viral post) लक्ष वेधून घेतं आहे. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, त्या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत. खास करुन एक कॅमेऱ्या मॅन हा फोटो खराब करतोय असं म्हणायलाही हरकत नाही. 

या पिवळ्या लेहेंगा घेतलेल्या तरुणीनीलाही हे लक्षात आलं. मग काय तिने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करुन मदत मागितली. हा शेअर करताना ती म्हणाली की कोणी तरी या फोटोतील फोटोग्राफरला काढून टाका. अन् हे काय तिने एक मदत मागितली आणि हजारो संख्येने लोक मदतीला आलेत…

ट्विटरवर हा फोटो या तरुणीने शेअर केला आहे. तुम्हीही कदाचित तो पाहिला असेल. पण तुम्हाला माहिती आहे. या फोटोला रेकॉर्डब्रेक व्ह्यूज-कमेंट्स मिळाले आहेत. या तरुणीच्या फोटोला आतापर्यंत 1.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा फोटो 11 मार्च 2023 शनिवारी तिने ट्वीटरवर शेअर केला होता. 

कोण आहे ही तरुणी?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल ही तरुणी महाराष्ट्रीय (Maharashtra girl) आहे. पण ती सध्या राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये (Jaipur) राहते. नैना (Naina) असं तिचं नाव असून ती मार्केटिंगचं काम करते. मग राव ती त्याचा एका फोटोची मस्त मार्केटिंग केली आहे. 

नैनाने हा फोटो 21 फेब्रुवाराली एका कार्यक्रमात काढला होता. तिच्या एका मदतीच्या हाकेला हजारो लोक धावून आले…असंच म्हणायला हवं की लोकांचं हृदय किती मोठं आहे ना…

तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काही यूजर्सने लिहिलं आहे की, तिने बेरोजगार तरुणांना कामी लावलं. तर काही यूजर्सने तिच्या मार्केटिंग स्टाईलचं कौतुक केलं आहे. 

काही असो राव या पोटीने सोशल मीडियाचा चांगलाच फायदा करुन घेतला आणि तरुणांना वेड लावलं. असं करणे भल्याभल्या लोकांना जमत नाही राव…



Source link

हेही वाचा :  चित्रा वाघ यांच्या ट्वीटला उर्फीचा रिप्लाय

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, ‘मंत्री महोदयांच्या दबावामुळे..’

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन …

20 हजार पगार असलेला कसा बनू शकतो करोडपती! समजून घ्या 70:15:15 चा फॉर्मुला

Crorepati Calculator: आयुष्यात करोडपती व्हावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न कधी प्रत्यक्षात उतरेल …