Breaking News

Kejirwal Slams PM Modi: मोदींच्या शिक्षणावरुन केजरीवालांचा टोला; म्हणाले, “पंतप्रधान शिकलेले असते तर…”

Kejriwal Slams PM Modi: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मंगळवारी पंतप्रदान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाणा साधला. आपल्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आल्याच्या मुद्याबरोबरच नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधानांवर टीका करताना केजरीवाल यांनी देशाच्या पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती शिकलेली असणं गरजेचं आहे, असं म्हटलं आहे. शैक्षणिक पात्रता कमी असलेल्या पंतप्रधानांना कोणीही फसवू शकतं, असं केजरीवाल यांनी भोपाळमधील दशहरा मैदानामधील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करताना म्हटलं. 

त्यांना दोघांनाही तुरुंगात टाकलं

“माझ्या दोन चांगल्या मंत्र्यांना अटक केली. एक आहेत सत्येन्द्र जैन ज्यांनी दिल्लीमध्ये मोफत वीज, आरोग्य आणि औषध सेवा सुरु केली होती. त्यांनीच मोहल्ला क्लिनिक सुरु केलं होतं. त्यांना पंतप्रधानांनी तुरुंगात टाकलं आहे. दुसरे आहेत मनीष सिसोदिया. ज्यांनी दिल्लीतील गरीब मुलांना चांगलं शिक्षण दिलं. पंतप्रधानांनी सिसोदिया यांनाही तुरुंगात टाकलं,” असं केजरीवाल म्हणाले.

…तर सिसोदियांना देशाचं शिक्षणंत्री केलं असतं

केजरीवाल यांनी मोदींना टोला लगावताना, “ज्या दिवशी सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यात आला त्या दिवशी मला वाटलं की देशाचे पंतप्रधान शिकलेले असणं फार आवश्यक आहे. जर ते शिकलेले असते तर त्यांना शिक्षणाचं महत्त्वं समजलं असतं. पंतप्रधान देशभक्त असते तर त्यांनी सिसोदिया कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार केला नसता. त्यांनी सिसोदियांना देशाचं शिक्षणमंत्री पद दिलं असतं,” असंही म्हणाले.

नोटबंदीवरुनच टोला

नोटबंदीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींवर केजरीवाल यांनी टीका केली. “प्रधानमंत्री शिकलेले असणं आवश्यक आहे. असं असेल तर कमी शिकलेल्या पंतप्रधानांना कोणीही फसवू शकतं. नोटबंदी करा म्हणजे भ्रष्टाचार-दहशतवाद संपेल, (असं त्यांना सांगण्यात आलं)” असंही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांनी मंचावरुन कार्यकर्त्यांना “नोटबंदीमुळे भ्रष्टाचार-दहशतवाद कमी झाला का?” असा सवाल केला. यावर सर्व कार्यकर्त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. “शिकलेल्या पंतप्रधानांना अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान असतं. नोटबंदीमुळे संपूर्ण देशातील उद्योग बंद झाले. भ्रष्टाचारही संपला नाही आणि दहशतवादही संपला नाही,” असं केजरीवाल म्हणाले.

कोरोनावरुन केली टीका

कोरोना संकटाच्या कालावधीमध्ये लोकांना थाळ्या वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलं, असं म्हणत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला. “पंतप्रधानांनी कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी तुमच्याकडून घंटा वाजवून घेतल्या. त्याने कोरोना संपला का? त्यामुळेच मी म्हणतो की पंतप्रधान हे सुशिक्षित हवेत,” असं म्हणत केजरीवाल यांनी टोला लगावला.

हेही वाचा :  किरीट सोमय्या विरुद्ध शिवसेना राडा सुरूच, कोर्लई गावात शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत …

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरस

SSC Result 2024 Maharashtra Board: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या …