Jyotika Dilaik Wedding: लाल लेहंग्यात सौंदर्याने न्हाऊन निघाली रूबिना दिलैकची लहान बहीण

अभिनेत्री रूबिना दिलैकची बहीण ज्योतिका दिलैक बिग बॉसमध्ये येऊन गेल्यापासून नॅशनल क्रश झाली होती. तर आता अनेकांचं मन मोडून बॉयफ्रेंड रजत शर्माशी ज्योतिकाने हिमाचल प्रदेशात लग्नगाठ बांधली आहे. ज्योतिकाने लग्नासाठी लाल रंगाच्या लेहंग्याची निवड केली असून या रंगामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

रूबिनानेदेखील यावेळी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या लहान बहिणीसाठी भावनात्मक पोस्ट लिहून फोटो शेअर केले आहेत. ज्योतिकाने लग्नासाठी केलेला लुक हा कतरिना, दीपिका यांच्या लुकची आठवण करून देणारा ठरतोय. मात्र ज्योतिका या लुकमध्ये कोणत्याही हिरॉईनपेक्षा कमी दिसत नाही. (फोटो सौजन्य – @rubinadilaik @jyotikadilaik Instagram)

गोल्डन एम्ब्रॉयडरीसह लाल लेहंगा

गोल्डन एम्ब्रॉयडरीसह लाल लेहंगा

ज्योतिकाने गोल्डन एम्ब्रॉयडरीसह लाल लेहंगा लग्नात परिधान केला होता. याच रंगाचा दुपट्टाही तिने घातला होता. तिचा हा लुक पाहून दीपिका पादुकोणची आठवण आल्याशिवाय राहात नाहीये. संपूर्ण लेहग्यांवर गोल्डन एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती.

हेव्ही दागिन्यांमध्ये दिसली अधिक सुंदर

हेव्ही दागिन्यांमध्ये दिसली अधिक सुंदर

या लाल लेहंग्यासह ज्योतिकाने गोल्डन आणि कुंदनचे दागिने घातले होते. मांगटिका, नथ, हेव्ही नेकलेस आणि मोठे कानातले घालून ज्योतिकाने लग्नातील नववधूचा लुक पूर्ण केला होता. लाल लेहंग्याला सूट होतील असेच हे दागिने दिसत होते.

हेही वाचा :  Maharashtra Politics : मग काम कुठं मागायचं? 'त्या' विधानावर राज ठाकरे यांना अजित पवार यांचा सवाल

(वाचा – केसात गजरा, करारी नजर जान्हवी कपूरचा असा लुक की श्रीदेवीचाच भास, ब्लाऊजलेस साडीतील फोटो व्हायरल)

लाल चुडा आणि रॉयल निळा दुपट्टा

लाल चुडा आणि रॉयल निळा दुपट्टा

ज्योतिकाने हातात नववधूला शोभणारा लाल चुडा घातला होता आणि लाल रंगाच्या लेहंग्यावर एखा बाजूला मखमली असा रॉयल ब्लू रंगाचा आणि त्यावर सिल्व्हर बॉर्डर असणारा दुपट्टा घेतला होता. ज्योतिकाच्या चेहऱ्यावरील हास्याने चारचाँद लावलेले दिसून येत आहेत.

(वाचा – हुमा कुरेशीच्या लुक्सने विस्फारतील डोळे, अबु जानी संदीप खोसलाच्या डिझाईनर्स कपड्यातील रॉयल लुक)

लाल घुंगटमधील नवरी

लाल घुंगटमधील नवरी

ज्योतिका आणि रजतचे लग्न हे हिमाचल प्रदेशातील रितीरिवाजनुसार करण्यात आले. यावेळी ज्योतिकाने वरमाळा आणि सात फेऱ्यांसाठी मंडपात जाताना लाल रंगाचा सुंदर घुंगट ओढून घेतला होता. मात्र त्यातूनही ज्योतिकाच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता.

(वाचा – ‘परी म्हणू की सुंदरा’ प्रियाचे परफेक्ट साडी लुक्स, पारंपरिक आणि मॉडर्न तडका)

न्यूड मेकअप

न्यूड मेकअप

लग्नासाठी हल्ली न्यूड मेकअप अधिक वापरण्यात येतोय. ज्योतिकानेही न्यूड मेकअपचाच आधार घेतला होता. आयलॅशेसह मस्कारा, काजळ, ड्यूई बेस आणि पिंक न्यूड शेड लिपस्टिक लावत तिचा हा लुक पूर्ण करण्यात आला होता. या लुकमुळे ज्योतिकाच्या सौंदर्यात भर पडली होती.
तुम्हालाही लग्नात असा लुक करायचा असेल तर ज्योतिकाच्या लुकवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. ज्योतिकाचा हा लुक अधिक नॅचरल दिसून येत आहे.

हेही वाचा :  Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशारा



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

अंगठी आणि गळ्यातल्या मंगळसुत्रामुळे ओळख पटली, डोंबवली स्फोटात त्याने आपली पत्नी गमावली

Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. …

VIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे धक्कादायक …