Aurangabad to Be Renamed: औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटणार; MIM खासदाराचा नवीन नाव सुचवत आंदोलनाचा इशारा

Aurangabad to Be Renamed:: औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुन्हा पेटणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  चांगलेच आक्रमक झाले आहेत. जलील यांनी औरंगाबादसाठी नविन नाव सुचवले आहे. जलील नामांतर विरोधात आंदोलन जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराला मंजुरी दिली आहे. यामुळे  औरंगाबाद  (Aurangabad)शहर आणि जिल्ह्याचं नाव आता छत्रपती संभाजीनगर  (Chatrapati Sambhajinagar) करण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे. मात्र, जलील यांनी या वादात नवा ट्विस्ट आणला आहे. 

मलिक अंबर यांच्या नावावरून औरंगाबादचे नाव अंबराबाद करून टाका असे जलील यांनी सुचवले आहे. फक्त बाळासाहेब आले. राजनीतीचे दुकान उघडलं ते म्हणाले मी या शहराचे नाव संभाजी नगर करणार. या वरून त्यांनी 30 वर्ष घाणेरडे राजकारण केले असा आरोप जलील यांनी केला. 

बिहार मध्ये पण एक औरंगाबाद आहे, तिथं भाजपचे खासदार आहे. मग ते औरंगाबाद भाजपला चालते का? या अधिवेशनात ठराव घ्या.. आणि नाव बदलून टाका. तुम्हाला औरंगाबाद नको म्हणून तुम्ही महापुरुषांच्या नावात बदल केला. आता या शहरांचाही करुन घ्या. जी 20 साठी शहर सजवले. मात्र, दोन 2 दिवस शहर सजवून काय साध्य केले. शहराच्या नामांतराला माझा विरोध कायम आहे. मात्र, याचा जाती धर्माशी संबंध नाही. काही लोकं जाणिपूर्वक मुद्दा भरकवट आहेत. आम्ही औरंगजेब सोबत नाव जोडतो म्हणून आम्ही पाकिस्तानात जावे असेही लोक आम्हाला सांगतात. 

हेही वाचा :  अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या आलिशान घरातून दिसतो अथांग समुद्र, असे होम डेकोर करा

मी सगळ्या जातीधर्माचा खासदार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय सबंध आहे कुणी सांगावे. त्यावरून या शहराचे नाव का बदलणार. शहरांच्या नावाला तसा काहीही अर्थ नाही. म्हणून, कोल्हापूरच नाव छत्रपती शाहू नगर करा, पुणे – फुले नगर अथवा फुले करा फक्त नागपूर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर असं करा. कारण तिथं दीक्षाभूमी आहे. मुंबई या नावाला ही अर्थ नाही. या शहराला , छत्रपती शिवाजी राजे महानगर नाव करा. मालेगावला मौलाना आबाद  नाव करा असे जलील यांनी सुचवले. 

नाव बदलताना काही इतिहास संबंध असायला हवा अस मत त्यांनी मांडले. मलिक अंबर या शहरात आला. इथं पिण्याचं पाणी आणलं, आज जे उडताय त्यांच्या बाप दादांनी हे मलिक अंबर ने आणलेलं पाणी पिऊन मोठं झाले आहेत अशी टीका देखील त्यांनी केली. 

प्रकरण कोर्टात असताना निर्णय कसा घेतला?

राज्य सरकारने औरंगाबादच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर हा मुद्दा हायकोर्टात उपस्थित करण्यात आला होता. प्रकरण कोर्टात असताना निर्णय कसा घेतला? देशात हुकूमशाही आहे की लोकशाही आहे असा सवालही जलील यांनी उपस्थित केला आहे. 
अनेक लोक नामांतरमुळे नाराज झाले आहेत.  या निर्णयामुळे तुम्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी याचा विरोध करू शकतो, हा माझा अधिकार आहे आणि विरोध करणार अशी ठाम भूमिका जलील यांनी मांडली आहे. 

हेही वाचा :  viral snake video: सापाला चिकनप्रमाणे कचाकचा चावून खाल्लं...Viral Video पाहून येईल किळस



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा; महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान

Lokshabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी  आज (20 मे) मतदान होत …

Ebrahim Raisi : इराणच्‍या राष्ट्राध्यक्षाच्‍या हेलिकॉप्टरचा अपघात; पीएम मोदी चिंतेत, म्हणाले…

PM Modi On Iran helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी (Ebrahim Raisi) आणि परराष्ट्र …