Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

How To Make Perfect dhokala : नाश्त्याला रोज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न प्रत्येक घरात रोज पडलेला असतो. शिरा पोहे उपमा करून आणि खाऊन कंटाळा येतो  मग नवीन काहीतरी बनवण्याची फर्माईश सोडली जाते  पण नेमकं काय बरं  बनवायचं आणि त्यात एखादा नवीन पदार्थ बनवायचा म्हणजे तो अपहील्या वेळेत अगदी छान होईल असं पण नाही ना? नेमका अश्यावेळी बेत फसतो आणि मग काय मूड ऑफ!  बाहेरून काही आणून खाणं रोज जमत नाही आणि बाहेरच खाणं शरीरासाठी हानिकारक असत हे हि तितकंच खरं आहे. त्यामुळे तब्ब्येत उत्तम ठेवायचीअसेल तर नेहमी घरचंच खाल्लेलं केव्हाही चांगलच (Cooking Tips tricks)

तर आज जाणून घेऊया खमण ढोकळा बनवण्याची सर्वात सोपी पद्धत (how to make perfect  khaman dhokla at home )

खमन ढोकळा (Khaman Dhokla easy quick Recipe) हा गुजरातमधील प्रसिद्ध ब्रेकफास्ट जसं आपल्याकडे पोहे आणि उपमा दररोज नाश्त्यासाठी बनवला जातो तसाच गुजरातमध्ये ढोकळा हा रोजचा नाश्ता आहे. मुंबई उपनगरांमध्येसुद्धा खमण ढोकळा खूप प्रमाणात खाल्ला जातो . पण जेव्हा आपण ढोकळा घरी बनवण्याचा बेत आखतो तेव्हा तो बेत फसतो. काही तरी चुकतं आणि ढोकळा भलताच होऊन जातो.( Cooking Tips How to make dhokala)

हेही वाचा :  'सन्माननीय सदस्य न्याय मिळाला पाहिजे चौकशी करू, समिती नेमू...' सदाभाऊंनी सांगितला नाथाभाऊंचा कानमंत्र

1) खमण ढोकळा तयार करण्यासाठी सर्वात आधी बेसन, रवा आणि मीठ घ्या ते व्यवस्थित एकत्रित करून घ्या, दुसरीकडे एका भांड्यात 2-3 कप पाणी घ्या आणि माध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेऊन द्या. 

2) ढोकळा सेट करण्यासाठी ठेवण्याआधी ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे ते भांड किमान 5 मिनिटे तरी गरम करायला हवे. आता 2 लहान प्लेट्स घ्या आणि या प्लेट्स आकाराने लहान असाव्यात कि जेणेकरून भांड्यात बसतील. प्लेट्सना 1 टीस्पून तेलाने ग्रीस करा.

3) आता आणखी एक मोठं भांड घ्या त्यात बेसन रवा  लिंबाचा रस , हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट , दही आणि पाऊण वाटी पाणी घाला आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या , चवीप्रमाणे त्यात मीठ घाला आणि पुन्हा एकदा एकत्रित करून घ्या ,पिठात गुठळ्या राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यात  फ्रुट सॉल्ट (fruit salt) घाला ते नसेल तर इनो घातला तरी चालेल. पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. 

4) आता तुमचं मिश्रण फुगून दुप्पट होईल आता लगेच ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून घ्या. (kitchen tips)

हेही वाचा :  कोकणात राजकीय शिमगा पेटला, पोलिसांचा विरोध झुगारुन किरीट सोमय्यांची दापोलीकडे कूच

5) आता ढोकळा बनवण्यासाठी मोठ्या भांड्यात स्टॅन्ड ठेऊन द्या त्यावर एक प्लेट ठेवा आणि चांगला शिजू द्या. 10-12  मिनिटे झाल्यावर सुरीच्या मदतीने ढोकळा शिजलंय का हे पाहून घ्या. 

6) सुरी घातल्यानंतर ती जर चिकटली तर ढोकळा अजून शिजवू द्यावा हे लक्षात घ्या.. आणि सूरी चिकटली नाही तर ढोकळा तयार  मग छान काप करून घ्या आणि वरून मोहरीची खमंग फोडणी घालून मस्तपैकी आंबट गोड  चटणीसोबत तो खाऊन घ्या आणि हो बाजारातून आणलेल्या ढोकळ्याप्रमाणेच तो मस्त होईल यात शंका नाही. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …