Uddhav Thackeray: धनुष्यबाणानंतर आता ‘मशाल’ही जाणार, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं!

Shiv Sena Mashal Controversy Samata Party : केंद्रीय निवडणूक आयोगानं (ECI) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यावर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. त्यामुळे आता ठाकरे कुटुंबियांच्या हातातून ‘शिवसेना’ निसटली असं चित्र स्पष्ट झालं आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यावर धक्के बसल्याचं पहायला मिळतंय.

निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालपत्रात उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांना फक्त पोटनिवडणुकीपुरतीच म्हणजे 26 फेब्रुवारीपर्यंत ही परवानगी असणार आहे. अशातच आता ठाकरे गटाला आणखी एक फटका बसलाय. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीने (Samta Party) पुन्हा एकदा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल (Mashal) चिन्ह देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचा पक्ष आणि चिन्ह अद्याप मान्यताप्राप्त नाही. शिवाय मशाल चिन्ह समता पार्टीकडे आहे. त्यामुळे मशाल ठाकरेंना देता येणार नाही. समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

आणखी वाचा – Dhanushyaban Symbol: ‘काळ्या बाजारात सुद्धा…’, एकनाथ शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया!

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला चिन्ह देऊ नये, अशी याचिका समता पार्टीने न्यायालयात दाखल (Mashal Controversy) केली होती. मात्र, द्विसदस्यीय खंडपीठानेही याचिका फेटाळून होती. त्यामुळे त्यावेळी उद्धव ठाकरे यांचा रस्ता मोकळा झाला होता. अशातच आता उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी पुन्हा वाढणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेणार आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल, याचीही उत्सुकता आहे.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident Case : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. पुण्यातील …

Loksabha Election 2024 : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंबाला नाही करता येणार काँग्रेससाठी मतदान; काय आहे कारण?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रात सध्या निवडणूक आणि तत्सम घडामोडींचा वेग काहीसा मंदावला असला, तरीही …