Corona Virus : देशात पुन्हा अलर्ट, ‘या’ रुग्णांना करावी लागणार कोरोना चाचणी

Corona Virus : Indian Council of Medical Research (ICMR) आयसीएमआरकडून शुक्रवारी रुग्णालयांना महत्त्वाचा इशारा देत influenza-like illnesses आणि SARIs च्या 5 टक्के रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी अशी विचारणा केली आहे. 

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशात तुलनेनं चाचण्यांच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. किंबहुना सध्या देशात कोरोना रुग्णसंख्याही अटोक्यात आहे. पण कोरोना रुग्ण संसर्ग प्राथमिक स्तरावर असतानाच निदर्शनास यावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

आयसीएमआरकडून ही नवी नियमावली विशेषत: 60 वर्षांवरील कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यत वेळेत उपचार पोहोचवून त्यांना विलगीकरणाच्या सुविझा पुरवण्यावर केंद्रित असेल. 

डायबिटीज, हायपरटेंशन आणि इतर कोमोर्बिडीटीज असणाऱ्या रुग्णांना इतर विषाणूंच्या आघातातून रोखण्यासाठी हा नियम फायद्याचा ठरेल.

कोरोनाची लक्षणं काय आहेत?

  • घशात होणारी खवखव आणि न थांबणारा खोकला

घशात खवखव किंवा घसा जड सुजल्यासारखा वाटू शकतो… न थांबणारा खोकला साधारण तासाभरापेक्षा जास्त वेळ येतो. दिवसभरात दोन ते तीन वेळेस असू होवू शकतं की अचानक न थांबणारा खोकला येतो.

  • शरीराच तापमान वाढणे म्हणजेच ताप येणे

शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त असणे.

  • तोंडाची चव जाणे आणि वास येण्याची क्षमता बदलणे
हेही वाचा :  “टायगर नेहमीच तयार असतो…”, सलमान खान आणि कतरिनाचा बहुचर्चित Tiger 3 चा टीझर प्रदर्शित

तुम्ही काहीही खाल्लं तरी पूर्वी जी चव तुम्हाला त्या पदार्थाची येत होती ती येत नाही, त्या पदार्थाची चव खूपच बदलली आहे, किंवा चव गेली आहे असं तुम्हाला वाटेल.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Rain Update : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान …

Maharastra Politics : ‘अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, गांगरल्यासारखे…’, अंजली दमानिया यांची मागणी

Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणानंतर आता …