Jitendra Awhad Interview: तुम्हाला ‘बोक्या’ का म्हणतात? जितेंद्र आव्हाडांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझे डोळे….”

Jitendra Awhad Black and White Interview: जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) कधीही कोणत्या टीकेला, नामकरणाला घाबरलेला नाही. माझे विचार, तत्वं सोडून मी वागणार नाही. सेक्युलर म्हटलं की मुस्लीमधार्जिणा असं एक व्याख्या तयार झाली आहे. मी कट्टर सेक्युलर, आंबेडकरवादी, शोषितांच्या बाजूने उभा राहणारा आहे. याचं मला कधीच वाईट वाटत नाही. माझं मन साफ आहे. जिथे जिथे अन्याय, अत्याचार होत असेल तिथे मी उभा राहणार. मग तो मुस्लीम, दलित, मागासवर्गीय, ओबीसी आहेत का हे मी पाहत नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. ‘झी 24 तास’च्या ‘Black and White’ या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली.

तुम्हाला बोक्या का म्हणतात? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आमच्याकडे सध्या खोके खूप फॉर्मात आहेत. आमच्यातील काही नगरसेवक त्या खोक्यांना बळी पडले आहेत. आमच्या इथे पोखरकर नावाचा एक ब्लॉग रायटर आहे त्याने हे खोका-बोका पोस्टर लावलं आहे. खोका घेणाऱ्या बोक्यांना जनता माफ करणार नाही असं ते विडंबन आहे. त्यावरुन मग मला आता कदाचित माझ्या घाऱ्या डोळ्यांवरुन बोक्या म्हणत असतील,” दरम्यान जितुद्दीन म्हणो किंवा आव्हाडुद्दीन म्हणो, मला फरक पडत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा :  क्युट ड्रेस परिधान करुन मुकेश अंबानींच्या सुनेने वेधले सर्वांचे लक्ष, पृथ्वीच्या बर्थडेला संतुर मॉम गेली भाव घाऊन

किती नगरसेवक फुटतील असं विचारण्यात आलं असता त्यांनी उत्तर दिलं की, “जास्त फुटणार नाहीत, पण काही गद्दार लगेच जातात. माझ्या आयुष्यात मी एक चूक केली. ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे अशा मुंब्र्यातील कुटुंबाला माफ करुन जवळ घेतलं आणि त्यांनी पुन्हा गद्दारी केली”. माझ्या जवळचा एकही नगरसेवक जाणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. 

“मुंब्र्याची आणि माझ्या मतदारसंघाचा विचार केला तर हिंदूंची संख्या जास्त आहे. कळवा आणि मुंब्र्यात 2.5 लाख हिंदू आणि 1 लाख 90 हजार मुस्लिम मतं आहेत. 25 हजाराची आघाडी मलाच मिळाली होती. लोक मी केलेल्या विकासाच्या कामावर मतदान करतात. ज्या शहरांना ओळख नव्हती, जिथे एक फ्लॅट 2.5 ते 3 हजाराच विकला जायचा त्या कळव्यात 12 आणि 14 हजाराला फ्लॅट विकले जात आहेत. कॉक्रिटचा नाही असा एकही रस्ता नाही,” असं आव्हाड म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे संबंध का बिघडले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतचे संबंध का बिघडले असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “ते मलाही समजलं नाही. मी त्यांना विचारण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी जे उत्तर मला दिलं होतं ते महाराष्ट्रालाही कळलं पाहिजे. माझ्यासोबत असं केलं विचारलं असता ते म्हणतात, अरे जितेंद्र मी कुठे केलं. तुला माहिती आहे ना कोण करतं ते. मला इतकंच माहिती आहे की, मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय माझ्यावरील अटकेची कारवाई झालेली नसणार. आयुक्तांमध्ये मुख्यमंत्र्यांना सांगितल्याशिवाय कारवाई करण्याची हिंमत नाही. शिंदे गटात प्रवेश कऱण्यासाठी तर थेट धमकावलं जात आहे. अन्यथा खोटा मोक्का लावण्याची धमकी दिली जात आहे”.

हेही वाचा :  "शरद पवार ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत" | BJP Gopichand Padalkar on NCP Sharad Pawar sgy 87

“मी एकनाथ शिंदेंसह मैत्री होती हे नाकारत नाही. पण माझ्यावर 354 लावण्यात आलं आणि त्यावर त्यांनी माझा काही संबंध नाही म्हटलं तेव्हा मला कुठेतरी पाणी मुरतंय हे कळून चुकलं होतं. तेव्हा मला आपण अलर्ट व्हायला हवं असं वाटलं,” असं आव्हाड म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha Election : काहींची नावं गायब, तर काहींचा अपंग म्हणून उल्लेख; मतदार यादीतील घोळ संपता संपेना

Loksabha Election 2024 Voting List : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधुम सुरु आहे. लोकसभेच्या …

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट

8th pay commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात …