How to become Tahsildar: तहसीलदार बनायचे आहे? पाहा किती असतो पगार आणि कशा मिळतात सुविधा…

naib tehsildar salary: आपल्या सगळ्यांचीच अशी इच्छा असते की आपणही मोठं शिक्षण घ्यावं आणि आपल्या गावाचा विकास करावा. त्यासाठी आपल्याला शासकीय सेवा प्रवेश परीक्षा (Civil Service Exam) द्याव्या लागतात. त्यातील एक महत्त्वाची परीक्षा असते ती म्हणजे तहसीलदाराची (Tasildar Salary). तुम्हालाही जाणून घ्यायला आवडेल की नक्की तहसीलदार या पदाची सॅलरी किती असते आणि तुम्ही ती कशी मिळवू शकता. तेव्हा जाणून घेऊया की तहसीलदार बनण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यासाठी पात्रता किती लागते आणि तुम्हाला किती सॅलरी मिळू शकते. तहसीलदार म्हणजे जो सरकारसंबंधी सगळी कामं करतो. अगदी जमीनीशी संंबंधित काही कामं असतील किंवा टॅक्सशी संबंधित काही कामं असतील तर त्यासंबंधी सगळीच कामं तहसीलदाराला करावी लागतात. 

वरील संबंधित कामांमध्ये काही समस्या असतील किंवा काही नुकसान असेल तर त्यासंबंधीची सर्व कामे तहसीलदार करतो. काही महत्त्वाची कागदपत्रेही त्यादरम्यान देणे महत्त्वाचे असते सोबतच त्यासंदर्भातील काही कामं असेल तर तेही करावे लागते. तहसीलदार हे सर्वात मानचे पद असते. रिझर्व्ह कॅटेगरीतील (Age for civil service exam) अनेकांना यासंदर्भात सूटही मिळते. तहसीलदार होण्यासाठी तुमचे वय हे 21 ते 40 दरम्यान असावे लागते. तुमचे प्राथमिक शिक्षण होणे गरजेचे असते. त्याचबरोबर तुमचे ग्रॅज्यूएशनही होणं महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील स्थानिक भाषा येणंही आवश्यक आहे. तहसीलदाराच्या वेगवेगळ्या पदांना वेगवेगळी आणि चांगली सॅलरीही मिळते. 

हेही वाचा :  विश्लेषण : नसीरुद्दीन शाह देत आहेत Onomatomaniaसोबत झुंज; जाणून घ्या काय आहे हा आजार

सध्या या क्षेत्रात स्पर्धाही खूप वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्याला यासाठी खूप जोरात अभ्यास करणे आवश्यक असते. तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. यामध्ये रिक्तपद असणेही आवश्यक असते. तेव्हा या दोन्ही गोष्टी जर का जमून आल्या तर तुम्ही तहसीलदार बनू शकता. यासाठी सर्विस कमिशनद्वारे (Service Commission) एक जाहिरात दिली जाते आणि त्यानुसार तहसीलदार शोधण्यासाठी वेग येतो. यासाठी कधी कधी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाते तर तुम्हाला या क्षेत्रात भरती होण्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा देणे आवश्यक असते. 

अनेक ठिकाणी तुम्हाला राज्य सेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा देण्याची गरज नसते. परंतु तुम्हाला परीक्षा आणि इंटरव्ह्यू हा द्यावा लागतो. यामध्ये अनेक राऊंडही असतात. त्यातील अनेक राऊंड तुम्हाला पास कराव्या लागतात. यातील पहिली राऊंड ही स्क्रिन टेस्ट घेण्यात येते. यात तुम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारण्यात येतात. जर तुम्ही ही पास झालात तर तुम्हाला पुढील राऊंड पास करायची असते. 

परीक्षा आणि मुलाखत :

वरील टेस्ट पास झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागते. त्यात 4 पेपर्स असतात. हे चारही पेपर्स जर का तुम्ही क्लियर (How to clear tahsildar interview) केलेत तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येते. मुलाखतीत तुम्हाला म्हत्त्वाचे प्रश्न आणि तुमचा आधीचा स्कोअर तपासला जातो मग या राऊंड्समधून जर का तुम्ही पास झालात तर तुमचे सेलेक्शन होते. 

हेही वाचा :  Coronavirus : कोरोनाबाबत महत्त्वाची बातमी, आणखी 10 ते 12 दिवसात Corona चा वेग...

अशी करा तयारी : 

तहसीलदार होण्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागतो त्याचसोबत तुम्हाला चांगल्या प्रकारे अपडेट राहावे लागते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला अपडेट राहावे लागते. तुम्ही यासाठी चांगलं कोचिंगही लावू शकता. 

किती मिळते सॅलरी : 

तहसीलदारांना 9300 ते 34,800 रूपये एवढा पगार मिळतो. ग्रेड पे 4800 इतका दर महिन्याला असतो. पदोन्नतीनंतर 15600 ते 39100 इतका पगार मिळतो. आणि ग्रेड पे हा 5400 इतका असतो. त्याचसोबत महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता, पेन्शन आदी सुविधाही तुम्हाला मिळतात.  



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …