Pankaja Munde on BJP: पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर व्यक्त केली मनातली खदखद, म्हणाल्या…

Pankaja Munde on BJP: भाजपा नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. यादरम्यान आता पंकजा मुंडे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांच्यासमोर आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला आहे. तसंच आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या असंही म्हटलं आहे. 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यादरम्यान मंचावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार आणि इतर नेते उपस्थित होते. पंकजा मुंडे यांनी यावेळी भाषण करताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

“बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या,” असं आवाहन करत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. पंकजा मुंडे यांनी महाभारताच्या युद्धातील अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचे उदाहरण देत थेट पक्षश्रेष्टींवर निशाणा साधला. आता पंकजा मुंडेंच्या भाषणातील कर्ण आणि अर्जुन कोण यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

हेही वाचा :  पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

“जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी जिल्ह्याच्या मातीतील माणूस लागतो. बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला मोठा फरक पडतो, सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं, अशी अपेक्षा आहे. आज माझ्याकडे कोणतंही पद नाही. आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो,’ असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचा प्रयत्न

“पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपामध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक युनिट आहे. तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं मोठं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘हे वैचारिक दारिद्रयच, पंतप्रधान हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करणारी भाषणे..’; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On PM Modi Speechs: देशवासीयांना एकसंध ठेवण्याऐवजी केवळ मतांसाठी देशातील हिंदू व मुस्लिम …

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …