MPSC मेगाभरती : ऐतिहासिक ८०००+ जागांसाठी भरती ; गट ब आणि गट क संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८१६९ जागांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्याचा कालावधी २५ जानेवारी २०२३ पासून – अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२३ आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ८१६९ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ रविवार, दिनांक ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर जाहिरात घेण्यात येईल.

एकूण जागा : ८१६९

रिक्त पदांचे नाव आणि पदसंख्या :

1) सहायक कक्ष अधिकारी:- 78 पदे
2) राज्यकर निरीक्षक :-159 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक:- 374 पदे
4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-49 पदे
5) दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) :- 6 पदे
६) तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) :- 1 पदे

७) कर सहाय्यक, गट-क (वित्त) :- 468 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
८) लिपिक-टंकलेखक :- 7034 पदे
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

हेही वाचा :  SAMEER मुंबई येथे विविध पदांची भरती, विनापरीक्षा होणार निवड
image 1

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येतील :
महाराष्ट्र अराजपत्रित गट व सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ : ०२ सप्टेंबर २०२३
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ : ०९ सप्टेंबर २०२३

नियम व अटी :
– पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे.
– पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा / सूचना वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
– महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणा-या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत तसेच समाजाच्या उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नसल्याबाबत (नॉन क्रीमीलेअर) (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे.
-विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

हेही वाचा :  क्रिकेटरची आयपीएस पदी बाजी ; जिद्दीने जिंकले युपीएससीचे मैदान….

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

१. सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
२. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील, परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणा-या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणा-या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील
३. अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहीजे..
४. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

शारीरिक मोजमापे/अर्हता :
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विकल्प नमूद करणा-या उमेदवारांकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालीलप्रमाणे किमान शारीरिक अर्हता असणे आवश्यक आहे :
पुरुष :
उंची – १६५ सें मी
छाती न फुगविता : ७९ सें मी
फुगविण्याची क्षमता किमान ५ सें मी
महिला : १५७ सें मी

वयाची अट: ०१ मे २०२३ रोजी
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी : ३१ वर्ष
इतर सर्व पदांसाठी : ३८ वर्ष
[मागासवर्गीय & अनाथ: 05 वर्षे सूट]

हेही वाचा :  Mahavitaran पुणे येथे 55 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

परीक्षा फी :
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदांसाठी भरती

ECHS Recruitment 2024 : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली …

सामान्य कुटुंबातील मुलाची वनपरिक्षेत्र अधिकारी बाजी ; गावचा ठरला अभिमान

MPSC Success Story : आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊन अभ्यासाशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. तरच …