Optical Illusion: ‘या’ फोटोत लपला आहे स्नायपर, तुम्ही शोधू शकता का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध अद्याप काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. एक वर्षापूर्वी रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं होतं. या युद्धात दोन्ही देशातील सैनिक तसंच नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. फक्त लोकांनाच नाही तर अनेक मुक्या जनावरांचाही युद्धामुळे मृत्यू झाला आहे. अनेक नागरिकांवर आपलं राहतं घर सोडावं लागलं असून स्थलांतर करण्याची वेळ आली. पायाभूत सुविधाही नष्ट झाल्या आहेत. 

मात्र इतकं सर्व होऊनही दोन्ही देशाचे सैनिक अद्याप खंबीरपणे युद्धभूमीवर उभे आहेत. दोन्ही देशातील जवानांचं मनोबल भक्कम असून आपल्या देशाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी परिस्थितीवर मात करत जवान युद्धभूमीवर तैनात आहेत. 

यादरम्यान युक्रेनच्या लष्कराने शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोमध्ये एक स्नायपर बर्फाच्छादित प्रदेशात लपलेला आहे. विशेष म्हणजे फोटो पाहिल्यानंतर हा जवान नेमका कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला पडेल. 

तुम्ही या फोटोत स्नायपर कुठे लपला आहे हे शोधू शकता का?

ट्विट पाहिल्यानंतर अनेक युजर्स फोटोमध्ये स्नायपर नेमका कुठे लपला आहे याचा शोध घेत आहेत. सोशल मीडिया युजर्ससाठी हा फोटो ऑप्टिकल इल्यूजन ठरत आहे. 

हेही वाचा :  जो बायडन म्हणाले पुतीन 'वॉर क्रिमिनल'; रशियाचा संताप, आठवण करुन देत म्हणाले "जगभरात बॉम्ब टाकून..." | Ukraine Crisis Russia Slams Biden War Criminal Comment On Putin sgy 87

इतका शोध घेतल्यानंतरही जर तुम्हाला स्नायपर सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. निकाल पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल ना…

हा फोटो नेमका कधी आणि कुठे घेतला आहे याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. पण हा फोटो मात्र सोशल मीडियासाठी चर्चेचा विषय ठरत आहे. 

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून गृहमंत्र्यांसह 16 जण ठार

युक्रेनमध्ये हेलिकॉप्टर कोसळून (helicopter crash) 16  प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये गृहमंत्री (Home Minister) आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) ही हेलीकॉप्टर  दुर्घटना घडली आहे. बुधवारी सकाळी कीव जवळील ब्रोव्हरी येथे नर्सरी शाळेजवळील निवासी इमारतीवर हे हेलिकॉप्टर कोसळलं. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या

Crime News Today: उत्तर प्रदेशच्या देवी जागरणचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात …