Speak For India: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनो, व्यक्त व्हा… विचार मांडा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्रभरातील सर्व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी खुली असलेली, देशभरातील सर्वांत मोठी अशी ‘स्पीक फॉर इंडिया’ ही वक्तृत्व स्पर्धा लवकरच सुरू होत असून त्यासाठीच्या स्पर्धक नोंदणीस प्रारंभ झाला आहे. फेडरल बँकेच्या पुढाकाराने व

‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातील कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सभोवतालीच्या घडामोडींवर मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठीचे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

‘स्पीक फॉर इंडिया’ स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. कॉलेज विद्यार्थ्यांमधील वक्तृत्वगुणांना वाव देणारे हे देशातील सर्वांत मोठे व्यासपीठ आहे. या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना भोवतालीच्या घटना, विचारव्यूह आदींवर मतप्रदर्शन करता येईल. सध्या देशासमोर असलेल्या मुद्द्यांबाबत जागृती घडवून, त्यामागील कंगोरे शोधून व त्याबाबतचा व्यापक दृष्टिकोन सादर करून विद्यार्थ्यांना स्वत:ची भूमिका मांडता येईल. स्वतःला आजमावण्यासाठीचाही हा एक उत्तम मार्ग आहे. या स्पर्धेत विविध टप्पे असतील. ते सारे टप्पे यशस्वीरीत्या पार करणारा विद्यार्थी वा विद्यार्थिनी अंतिम विजेता वा विजेती ठरेल.

हेही वाचा :  CA Exams 2022: चार्टर्ड अकाउंटंट मे परीक्षेसाठी नोंदणी सुरु

स्पर्धेविषयी…

-राज्यातील सर्व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ‘स्पीक फॉर इंडिया’चे व्यासपीठ खुले आहे.

-या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबंधित स्तरावरील सहभागाचे प्रशस्तिपत्रक मिळेल.

-मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांतून या स्पर्धेत आपले विचार मांडण्याची मुभा असेल.

पारितोषिक असे आहे…

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला रोख २ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

दुसऱ्या क्रमांकावरील विजेत्या विद्यार्थ्याला रोख १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

अंतिम फेरीत निवड होणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळेल.

नोंदणी करा येथे…

www.speakforindia.in या वेबसाइटववर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.

सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून वेबसाइटवर जाता येईल.

पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची संधी, सहभागी होण्याची शेवटची तारीख वाढवली

पदवी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने

अशा होतील स्पर्धा…

२३ जानेवारी : मुंबई, औरंगाबाद, जालना, बीड. २४ जानेवारी : वाशी, अहमदनगर. २५ जानेवारी : पनवेल, पुणे. २७ जानेवारी : कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद. २८ जानेवारी : रत्नागिरी, नांदेड, परभणी, हिंगोली. ३० जानेवारी : सिंधुदुर्ग, अकोला, बुलढाणा, वाशीम. ३१ जानेवारी : सांगली, सातारा, अमरावती, यवतमाळ.

१ फेब्रुवारी : पुणे (दुसरी फेरी), नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर. २ फेब्रुवारी : ठाणे, गोंदिया, गडचिरोली. ३ फेब्रुवारी : पालघर

हेही वाचा :  Digital क्षेत्रात SEO तज्ञांना मोठी मागणी; लाखांमध्ये मिळेल पगार, करिअर कसे कराल? जाणून घ्या

४ फेब्रुवारी : मुंबई (दुसरी फेरी), जळगाव.

६ फेब्रुवारी : नाशिक, धुळे, नंदुरबार

JEE Mains:’आयआयटी-जेईई मेन्स’ पुढे ढकलणार? मुंबई हायकोर्टचा महत्वपूर्ण निर्णय

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …