सौंदर्याचा अस्सल कोल्हापूरी ठेचा व मराठमोळ्या शाही घराची लेक झाली खान फॅमिलीची सूनबाई

भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पत्नी आपलीच मराठमोळी अभिनेत्री सागरिका घाटगे आहे हे तुम्हाला सुद्धा माहित असेलच! ‘चक दे इंडिया’ मधील शाहरुख सोबतचा तिचा परफॉरमन्स आजही सगळ्यांच्या लक्षात आहे तो केवळ तिच्या दमदार अभिनयामुळेच! तर ही अभिनेत्री आणि आपला मुंबईकर मुलगा झहीर खान यांची प्रेमकहाणी नक्की जुळली कशी असले ओ?

त्यात नाही म्हटलं तरी धर्म वेग वेगळे, झहीर मुस्लिम आणि सागरिका हिंदू, मग या प्रेमकहाणीतील सर्व गोष्टी कशा जुळून आल्या, हा प्रश्न तुम्हालाही त्यांची जोडी पाहिल्यावर अनेकदा पडला असेलच ना. चला तर आज आपण त्यांची हीच आगळीवेगळी आणि गोड लव्हस्टोरी जाणून घेऊया आणि पाहुया की कशाप्रकारे या गोड अभिनेत्रीने इतरांना क्लीन बोल्ड करणाऱ्या गोलंदाजालाच प्रेमाच्या जाळ्यात कसे क्लीन बोल्ड केले! (फोटो साभार – TIO, @sagarikaghatge instagram)

सागरिकाचा जन्म कोल्हापूरच्या शाही घराण्यातला

हो, मंडळी अगदी बरोबर वाचलंत. सागरिकाचा जन्म कोल्हापूरच्या शाही घराण्यात झाला आहे. 8 जानेवारी 1986 रोजी जन्माला इलेली सागरिका कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या घराण्यातील एक लेक आहे. सागरिकाची आजी सीता राजे घाटगे इंदौरचे राजे तुकोजीराव होळकर यांची मुलगी होती शिवाय दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सागरिका ही एक राष्ट्रीय स्तरावरची हॉकी प्लेयर सुद्धा आहे आणि म्हणूनच चक दे इंडिया सारख्या हॉकी वर आधारित चित्रपटासाठी तिची निवड झाली होती. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करत तिने अभिनयातील आपले कौशल्य देखील दाखवून दिले.

हेही वाचा :  साऊथ स्टार विजय सेतूपतीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

(वाचा :- बॉस राहिल बाराही महिने खुश व देवी लक्ष्मीची होईल तुमच्यावर सदा कृपा, फक्त ऑफिसमध्ये फॉलो करा या 4 भारी ट्रिक्स)

झहीर खान होता दुसऱ्या मुलीच्या प्रेमात

सागरिकाला भेटण्याआधी झहीर हा दुसऱ्याच तरुणीच्या प्रेमात होता आणि ती तरुणी होती इशा शर्वनी! इशा ही एक डान्सर होती. झहीर आणि इशाची ओळख 2005 मध्ये झाली होती. सुरुवातीला दोघे चांग्के मित्र होते. पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हायला कितीसा वेळ लागतोय? आणि तसेच काहीसे झाले व झहीर आणि इशा रिलेशनशिप मध्ये आले. दोघे जण तब्बल 8 वर्षे रिलेशनशिप मध्ये होते. अनेकदा क्रिकेट ग्राउंड वर सुद्धा इशा झहीरला चीअर करायला आलेली दिसली.

(वाचा :- कोण म्हणतं लग्नाच्या गाठी स्वर्गात बनतात? मी तर एका अशा पुरूषाला भेटली जो स्वर्गात काय माझ्या नशिबातही नव्हता)

झहीरचे ब्रेकअप झाले

झहीर आणि इशा दोघेही प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघे लिव्ह इन मध्ये राहू लागले. दोघांचे लग्न होणार हे जवळपास निश्चित होते. 2011 च्या वर्ल्डकप दरम्यान सुद्धा झहीरच्या लाग्नःच्या बातम्या येऊ लागल्या. पण नियतीला जणू ह्या गोष्टी मान्य नव्हत्या. दोघांच्या आयुष्यात वेगळेच काहीतरी लिहिले होते. दोघांनी काहीच दिवसांत वेगळे झाल्याची घोषणा केली आणि एक क्युट कपल वेगळे झाले. नक्की दोघांत काय झाले होते याच उलगडला आजही झालेला नाही.

हेही वाचा :  'पोलिसांनी एवढं धुतलं की...'; आर्यन खानला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

(वाचा :- पुरूषहो, 40 वर्षांचे होण्याआधीच उरकून घ्या ही 5 कामे, नाहीतर बायकोचे गुलाम बनून राहण्यातच निघून जाईल आयुष्य..!)

सागरिकाशी झाली भेट

झहीर जेव्हा ब्रेकअपच्या काळातून जात होता आणि त्याने पूर्ण लक्ष क्रिकेट वर देण्याचे ठरवले तेव्हाच एका मित्राच्या घरी त्याची आणि सागरिकाची भेट झाली. पहिल्याच भेटीत दोघांचे स्वभाव जुळले. झहीरला तर ती ओळखत होतीच आणि झहीरने देखील चक डे इंडिया मधला तिचा परफॉरमन्स पाहिला होता. दोघांच्या प्रेमाची पहिली गाठ इथेच जुळली होती. दोघांनी मग एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. झहीरच्या भूतकाळाबद्दल सागरिकाला काही प्रॉब्लेम नव्हता. झहीर सुद्धा नव्याने सुरुवात करण्यास टायर होता.

(वाचा :- माझी कहाणी : माझं व नव-याचं कोणतंही प्रायव्हेट आयुष्य उरलेलं नाही, याला कारणीभूत हे दोन व्यक्ती ठरलेत, काय करू)

अखेर लग्नगाठ बांधली गेली

दोघांच्या प्रेमाच्या चर्चा सगळीकडे सुरु झाल्या. पण कधीच दोघांनी त्याबद्दल भाष्य केले नाही. मात्र जेव्हा क्रिकेटर युवराज सिंगचा विवाह सोहळा होता तेव्हा दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली आणि पहिल्यांदा आपल्या रिलेशनशिपची खुली कबुली दिली. धर्म वेगळे असल्याने घरच्यांना समजावण्यात त्यांना थोडी मेहनत घ्यावी लागली. पण अखेर त्यातही त्यांना यश आले व 2017 साली दोघांचा साखरपुडा पार पडला. 23 नोव्हेंबर 2017 रोजी अत्यंत साध्या पद्धतीने जवळच्या लोकांना बोलावून दोघांनी लग्न केले आणि तेव्हापासून आजपर्यंत हे कपल अत्यंत आनंदाने संसार करत आहे.

हेही वाचा :  अनंत अंबानी व राधिकाच्या साखरपुड्यात अवतरल्या दोन प-या, झगमगत्या लेहंग्यातील अनन्या-जान्हवीला बघून हरपेल शुद्ध

(वाचा :- मी एका अशा पुरूषाच्या प्रेमात पडली आहे जे प्रेम जगाला व कुटुंबाला कधीच मान्य होणार नाही, मग मी चुकीची आहे का?)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

नियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा ‘तो’ मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा ‘लेटर बॉम्ब’मुळे खळबळ

maharashtra news : भगवान पवार नावाच्या आरोग्य अधिका-यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याच निलंबित अधिका-यानं …

इथं जाणारा कधीच परत येत नाही, भारतातील रहस्यमयी बेट; इथले लोकं जगाला का घाबरतात? 145 वर्ष जुनं रहस्य

North Sentinel Island Andaman Islands Tribe : अंदमान निकोबारमधील नॉर्थ सेंटीनल बेट हे संपूर्ण जगासाठी …