गे.. नाही तर आम्ही फक्त पालक, आदित्य-अमितने शेअर केली त्यांच्या पालकत्वाची Good News

अमित शहा आणि आदित्य मदिराजू यांनी 2019 मध्ये न्यू जर्सी, यूएस येथे अतिशय थाटामाटात हिंदू पद्धतीने लग्न केलं. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली. आता हे कपल लवकरच पालकत्व अनुभवणार आहेत. मे महिन्यात होणाऱ्या यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. पीपल मॅगझिनने इंस्टाग्रामवर या जोडप्याच्या पितृत्वाच्या शूटचे आकर्षक फोटो शेअर करण्यात आले आहेत.

लग्न झाल्यापासून हे जोडपे जैविक मुलं होण्याच्या बारकावे शिकत आहेत. सरोगेट्स (surrogates), एग डोनर (egg donors) आणि जेस्चेशनल कॅरिअर्स (gestational carriers) यांच्यातील फरक समजून घेण्यापासून ते त्यांच्या कुटुंबाच्या वाढीचा भाग कसा होईल. कोण कोणती जबाबदारी पाडेल या सगळ्याचा विचार या दोघांनी केला आहे. अमित आणि आदित्य आता आपल्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. (फोटो सौजन्य – Amit Shah इंस्टाग्राम)

याबाबींचा केला विचार

heterosexual जोडप्यांच्या गर्भधारणेकरता लागणाऱ्या खर्चा पेक्षा या दोघांचा खर्च जास्त असल्याचेही त्यांना आढळून आले. Egg Doner शोधल्यानंतर बाळाकरता इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)चार वेळा करण्यात आले. यानंतर त्यांनी गुड न्यूज सगळ्यांसोबत शेअर केली आहे.

हेही वाचा :  श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या मतदान; पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

​जगासमोर ठरेल आदर्श

आदित्यने लोकांना सांगितले, “आम्ही आशा करतो की आम्हाला मूल होणे आणखी सामान्य होईल, तुम्ही समलिंगी जोडपे असलात तरी काही फरक पडत नाही, तुम्ही तुम्हाला हवे तसे जीवन जगू शकता. जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक असावे अशी माझी इच्छा आहे कारण आमचे लग्न झाल्यानंतर अनेकांनी लग्न केले आहे आणि त्यांनी आमचे आभार मानले आहेत कारण आमच्यामुळे त्यांच्या पालकांना आणि कुटुंबियांना कसे पटवून द्यायचे हे त्यांना समजले आहे. त्यामुळे हे देखील खूप उपयुक्त ठरेल.”

(वाचा – Normal Delivery Stitches: नॉर्मल डिलीवरीमध्ये का घालतात टाके आणि या सगळ्यातून बरं व्हायला लागतात किती दिवस?))

शेअर केली Good News

​समलिंगी पालक नाही तर फक्त पालक

कोणत्याही जोडप्याप्रमाणे, अमित आणि आदित्य मदर्स डे, फादर्स डे आणि इतर सर्व सण साजरे करतात. या जोडप्याला बाळाबद्दल उत्सुकता आहे आणि यानंतर त्यांचे आयुष्य कसे असेल याची उत्सुकता आहे. अमित म्हणाला, “आम्ही गे जोडप्याबद्दल बोलणार नाही. आम्ही फक्त जोडप्यांबद्दल बोलणार आहोत.” “आम्ही समलिंगी पालक होणार नाही, आम्ही फक्त पालक राहू,” असं आदित्य पुढे म्हणाला.

हेही वाचा :  अवैध धंद्याची पोलिसांना माहिती दिली, आरोपींनी बर्थ-डे पार्टीतच तरुणाला संपवले

(वाचा – पतीपासून दूर राहूनही ‘या’ पद्धतीने व्हा प्रेग्नेंट, इनफर्टिलिटीला मिळालं वरदान))

​थाटात पार पडला विवाह सोहळा

परीकथेप्रमाणे आदित्य आणि अमित यांचा विवाह हिंदू परंपरेनुसार २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता. या दोघांच्या कपड्यांपासून ते अगदी फोटोपर्यंत सगळ्याचीच चर्चा झाली. नुकताच या दोघांनी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजराकेला. आदित्यने इंस्टाग्रामवर एक छान पोस्ट देखील शेअर केली होती.

(वाचा – Farah Khan ने वयाच्या ४३ व्या वर्षी IVF च्या मदतीने अनुभवलं मातृत्व, कोणत्या वयापर्यंत होऊ शकता आई?)

​अशी झाली दोघांची भेट

२०१६ मध्ये अमित आणि आदित्य एका मित्राकडे भेटले. “आम्ही तीन वर्षांपूर्वी एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त लोअर ईस्ट साइड बारमध्ये भेटलो होतो. त्या रात्रीपासून, आम्ही एकत्र होतो,” पुढे अमित सांगतो की, “आमची व्यक्तिमत्त्वे पूर्णपणे भिन्न असली तरी, आमच्या काही आवडीनिवडी अगदी समना आहेत. आदित्य खूप क्रिएटिव्ह आहे. माझ्यासाठी परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असणं खूप महत्त्वाचं होतं. मला असा जोडीदार हवा होता जो खूप पॅशिनेट असेल असेल.” २०१९ मध्ये या दोघांनी लग्न केलं आणि २०२३ च्या मे महिन्यांत यांना पहिलं बाळ होणार आहे.

हेही वाचा :  सतत डोकं दुखतंय वेळीच व्हा सावध, असू शकतात मायग्रेनची लक्षणं



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘माझ्याकडे चीप..ईव्हीएम हॅक करतो’ दीड कोटींचा सौदा; धक्कादायक कहाणी

EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान …

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्…

पतीने रुग्णालयातच पत्नीची गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेत हा …